शिर्डी - चार महिन्यांपूर्वी साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांच्या विनयभंगाचे प्रकरण चांगलेच गाजले असतानाच आता पुन्हा याच रुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉयने कंत्राटी परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली. शिर्डी पोलिसांनी संशयित वॉर्डबॉय योगेश राजाराम चव्हाण (वय ३०) याला अटक केली आहे.
साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात २० मार्च ते ५ मेदरम्यान संशयित योगेश याने पीडित परिचारिकेचा पाठलाग केला. ती
आपली प्रेयसी असल्याचे तो इतरांना सांगत होता. तसेच पीडितेकडे पाहून अश्लील शेरेबाजी आणि वर्तन करीत होता. या प्रकाराला कंटाळून त्या परिचारिकेने शिर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ७ मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास सदर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला घरातून अटक केली. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात अाले. राहाता न्यायालयाने अाराेपीला १४ दिवसांची पोलिस कोठडी दिली अाहे.