आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Demand For School Leaving Certificate Nagar

दाखल्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याची तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विद्यार्थ्यांचा दाखला देण्यासाठी अरणगाव येथील वर्का इंग्लिश स्कूल विद्यालयात एका महिन्याच्या शुल्काची मागणी केली जाते, अशी तक्रार पालकांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात केली आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाने त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

पालकांनी तक्रारअर्जात म्हटले आहे की, आमचे पाल्य अरणगाव येथील वर्का इंग्लिश स्कूल येथे शिकत होते. पाल्याचा प्रवेश दुसर्‍या शाळेत घेतला, त्यासाठी दाखल्याची मागणी केली असता संबंधित शाळा प्रशासनाने पैशांची मागणी केली. पैसे न भरल्यास दाखला मिळणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार पालकांनी दाखल्यासाठी 1400 रुपये भरले. शाळा व्यवस्थापनाने या शुल्काच्या कच्च्या पावत्याही दिल्या आहेत. या प्रकाराची चौकशी होऊन न्याय मिळावा, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार अर्जावर सुदेश राठोड, दिनेश परदेशी, हसन सय्यद यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वर्का इंग्लिश स्कूलला नियमानुसार दाखला देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पालक राठोड म्हणाले, दाखला देण्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही. परंतु शाळेतील पालकांकडे पैशांची मागणी केली जाते. याबाबत न्यायालयात खासगी फिर्याद देणार असल्याचे विनय मुनोत व दिनेश परदेशी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

.तर शिक्षण विभागाकडे तक्रार करावी
शाळांमध्ये दाखला देण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, जर एखाद्या शाळेत असा प्रकार होत असेल, तर पालकांनी तातडीने शिक्षण विभागाकडे तक्रार करावी. या तक्रारीवरून लगेच संबंधित शाळेवर कार्यवाही केली जाईल.’’ एस. जी. मंडलिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक).

दाखल्यासाठी वेगळे पैसे नाहीत
विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला निकाल लागल्यावर लगेच न नेल्यास तो विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेणार असल्याचे समजले जाते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या जागेवर दुसर्‍या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात नाही. ऐनवेळी विद्यार्थ्याने दाखला मागितला त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर त्या तुकडीची पटसंख्या नियमानुसार पूर्ण होत नाही. त्यामुळे शाळेचे आर्थिक नुकसान होते. शाळा विनाअनुदानित तत्त्वावर असल्याने उशिरा दाखला घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून एक महिन्याचे शैक्षणिक शुल्क घेतले जाते. परंतु, पालकांच्या आग्रहास्तव हे शुल्क आम्ही बंद केले आहे. शाळेतील संबंधित लिपिकाने वैयक्तिक पैसे घेतले आहेत, ते पैसे शाळेच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. त्यामुळे संबंधित लिपिकावर कारवाई करण्यात येईल. ज्या पालकांकडून पैसे घेतले असतील त्यांनी पावत्या जमा कराव्यात, त्यांच्याकडून दाखला पाठवण्याची 250 रुपये फी घेतली जाईल, उर्वरित पैसे परत केले जातील. - एच. एन. रामीन, प्राचार्य, वर्का स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज.