आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशासाठी सावकाराची मारहाण; गेवराईत शिक्षकाची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - घरखर्चासाठी व्याजाने घेतलेले पैसे खासगी सावकाराला परत करूनही त्याने तगादा लावत मारहाण केल्याने गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने सुसाइड नोट लिहून राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 
श्रीकृष्ण गंगाधर चौधरी (४८) आम्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. गेवराई शहरात ते राहत होते. दोन दिवस सुट्या असल्याने ते कुटुंबासह कुंभारवाडी येथे गेले होते. शनिवारी सकाळी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...