आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : पावसाने उडवली दाणादाण, दररोज दुपारनंतर होते शहरात पर्जन्यवृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर शहरात जूनपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारीही शहर उपनगरांत जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत संततधार सुरु होती. - Divya Marathi
नगर शहरात जूनपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारीही शहर उपनगरांत जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत संततधार सुरु होती.
नगर : नगर शहर परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. दररोज दुपारनंतर होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात २४ टक्के पाऊस झाला आहे. 
 
नगर शहरात जूनपासून पावसाला सुरुवात झाली. गेल्या बारा दिवसांत अकोले तालुका वगळता जिल्ह्याच्या सर्व भागात दमदार पाऊस झाला आहे. राहाता तालुक्यात तर सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत राहाता तालुक्यात टक्केदेखील पाऊस झालेला नव्हता. 
 
मंगळवारी नगर परिसरात मृग नक्षत्राचा पाऊस झाला. सावेडी, नवनागापूर, भिंगार, केडगाव भागात रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने भाजीविक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.
 
गेल्या २४ तासांत मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नेवासे तालुक्यात सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस झाला. राहुरी १२, नगर २, शेवगाव ९.५, पारनेर ३५ कोपरगाव येथे मिलिमीटरची नोंद झाली. 
 
बातम्या आणखी आहेत...