आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Attention Needs To Oral Health Dr. , P. S.. Kamble

मौखिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज- डॉ. पी. एस. कांबळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-मौखिक आरोग्य समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याला वाढती व्यसनाधीनता व आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरते. मौखिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एस. कांबळे यांनी केले.
मौखिक आरोग्य दिनानिमित्त बुधवारी जिल्हा रुग्णालयात आयोजित जनजागृतीसाठी कार्यक्रमात ते बोलत होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती मुंढे, दंत शल्यचिकित्सक डॉ. दीपा शिरसाठ, परिचारिका प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ पाटोळे, प्रा. प्रल्हाद गुंजाळ आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. कांबळे म्हणाले, मौखिक आजार टाळण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. व्यसनांपासून दूर राहणे, झोपण्यापूर्वी व उठल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने मुखशुद्धी आदी बाबी प्राधान्याने कराव्यात. मुखाच्या कर्करोगाला निमंत्रण देणार्‍या व्यसनांपासून दूर राहण्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमानंतर रुग्णांची तपासणी करण्यात आली.
रुटकॅनालची सुविधा मार्चमध्ये
दंतचिकित्सा विभागात महागड्या रुटकॅनालची सुविधा सध्या उपलब्ध नाही. येत्या मार्चमध्ये ही सेवा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दंत चिकित्सातज्ज्ञ डॉ. दीपा शिरसाठ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
मौखिक आरोग्य दिनानिमित्त रुग्णांची तपासणी करताना डॉ. दीपा शिरसाठ. समवेत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एस. कांबळे.