आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यंगचित्रामध्ये सत्ता परिवर्तनाची ताकद : प्रभाकर झळके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - चिंतनाला कुंचल्याची जोड लाभली, तर त्यातून जन्मलेली कलाकृती म्हणजे व्यंगचित्र होय. जगण्याच्या चिंतनातून साकारलेले व्यंगचित्र कधी हसवते, कधी मार्गदर्शन करते, तर कधी चिमटे काढते. जळजळीत वास्तव मांडणाºया व्यंगचित्रात सत्ता परिवर्तनाचीही ताकद असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी केले.

श्रीरामपूरच्या आगाशे सभागृहात श्रीरामपूर प्रेस क्लबतर्फे 27 जून रोजी आयोजित व्यंगचित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई होते.
झळके म्हणाले, व्यंगचित्र विनोद निर्माण करते, व्यंगचित्र आयुष्यातील व्यंगावर बोट ठेवून हसायला भाग पाडते. व्यंगचित्र काढण्यासाठी जशी दृष्टी लागते, तसा सर्व विषयांचा अभ्यास लागतो. चित्र काढण्याची कला आणि समाजातील व्यंग शोधण्याची वृत्ती एकत्र आल्यास खºया अर्थाने व्यंगचित्रकार जन्माला येतो. व्यंगचित्र जगण्याचे भान वाढवण्याबरोबर जीवनात हास्याची कारंजीही निर्माण करते. सध्या व्यंगचित्रकाराची अवस्था वाईट आहे. तरीही उदावंत व भागवत यांची चित्रकला संवर्धनाची धडपड कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे यांचीही भाषणे झाली. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, लहू कानडे, राजेंद्र सोनवणे, बाबासाहेब सौदागर, सचिन गुजर, विश्वनाथ ओझा, प्रा. डॉ. गुंफा कोकाटे, भरत कुंकलोळ आदी या वेळी उपस्थित होते. स्वागत पत्रकार संतोष बनकर व प्रास्ताविक मिलिंदकुमार साळवे यांनी केले. सूत्रसंचालन करण नवले, विकास अंत्रे यांनी केले, तर आभार मनोज आगे यांनी मानले.
कलेची जोपासना
- व्यंगचित्र म्हणजे समाजातील व्यंगावर कुठल्याही शस्त्राविना केलेली शस्त्रक्रिया होय. समाजाच्या व्यंगावर अचूक बोट ठेवणाºया व्यंगचित्रकाराला त्रास दिला जातो. तरीही श्रीरामपुरात उदावंत व भागवत यांच्यामुळे निर्भिडपणे कलेची संस्कृती जोपासली जात आहे.’’
नामदेवराव देसाई, ज्येष्ठ साहित्यिक.