आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than Two Lakh Devotees Visit Saibaba Temple

शिर्डीत दहीहंडीने उत्सवाची सांगता, दुसर्‍या दिवशीही दोन लाख भाविक साईचरणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारपासून शिर्डीत सुरू असलेलल्या उत्सवाची मंगळवारी काल्याचे कीर्तन आणि दहीहंडीने थाटात सांगता झाली. गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशीही सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले.

उत्सवानिमित्त तीनही दिवस येणार्‍या प्रत्येक भाविकासाठी प्रसादालयात मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवीण श्रीवास्तव (दिल्ली), भगवती व चतुर्भूज वर्मा (झांशी) यांच्या देणगीतून मंगळवारी मोफत प्रसादभोजन देण्यात आले. दोन लाख भाविकांनी त्याचा लाभ घेतला. पालख्यांसह आलेल्या भाविकांसाठी व पदयात्रींसाठी अन्न पाकिटांची व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.

भाविकांना अडीच लाख पाकिटे प्रसाद लाडूंचे वाटप
उत्सवकाळात भाविक प्रसादाचे लाडू घेतात व ते कुटुंबीयांसाठी सोबत नेतात. त्यासाठी संस्थानने 200 क्विंटल साखरेचे लाडू तयार केले होते. सुमारे अडीच लाख पाकिटे भाविकांनी नेल्याची माहिती या वेळी देण्यात आली. समारोपप्रसंगी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील पूनम खन्ना यांचा साई भजनसंध्या व रात्री नऊ वाजता पुण्यातील जयराज कलसी यांचा सुफी व भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला.