आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटात विषारी औषध गेल्याने मायलेकींचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोटात विषारी औषध गेल्यामुळे मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवलेनगर परिसरात घडली. अत्यवस्थ असलेल्या धाकट्या मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनीता संजय गवांदे (42), धनर्शी संजय गवांदे (16) अशी मरण पावलेल्या मायलेकींची नावे आहेत. ऋतुजा संजय गवांदे (12) हिच्यावर उपचार सुरू आहेत. या तिघीजणी नवलेनगर परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होत्या. शुक्रवारी दुपारी त्यांच्या घरमालकिणीने तोफखाना पोलिसांना फोन करून विषारी औषध पोटात गेल्याने भाडेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तोफखाना पोलिस तत्काळ तेथे गेले. त्यानंतर मायलेकींचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. अत्यवस्थ असलेल्या ऋतुजावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकारामुळे नवलेनगर परिसरात खळबळ उडाली.