आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच केला पोटच्या तिन्ही मुलींचा खून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - काटाळवेढय़ातील तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू विषबाधेने झाला नसून निर्दयी आईनेच मुलींना पाण्यात विष कालवून मारल्याचे मंगळवारी उघड झाले. या प्रकरणी उज्ज्वला ऊर्फ शिल्पा विकास गाजरे हिला अटक करण्यात आली आहे.

काटाळवेढा येथे शुक्रवारी वैशाली (5), प्रतीक्षा (3) व अनुष्का (तीन महिने) यांचा मृत्यू होऊन आई अत्यवस्थ असल्याची घटना घडली. विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत होता. पारनेर पोलिसांनी घटनेची उकल केली. घराजवळच्या विहिरीत विष कालवून शिल्पानेच मुलींचा खून केल्याची फिर्याद मुलींची आजी तहानुबाई गाजरे यांनी दिली.

निर्दयी मातेचे मौन
मुलींचा खून का केला, यावर आई शिल्पाने मौन बाळगले आहे. मुलींना मारल्यानंतर अत्यवस्थ झाल्याचे नाटक करून ती नारायणगावच्या रुग्णालयात दाखल झाली होती. काहीच झाले नसल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यावर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.