आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्मदात्रीनेच केला चिमुकलीचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- मातृत्वाला शरमेने मान खाली घालायला लावेल असे कृत्य संगमनेरमध्ये एका मातेच्या हातून घडले. मानसिक रुग्ण असलेल्या मातेने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला विहिरीत फेकून तिचा खून केला. ही घटना शनिवारी पोलिसांनी उघडकीस आणली. शहर पोलिस ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर गुरुवारी हा प्रकार घडला.

मिसबाह फरिद मुल्ला (२२ वर्षे) असे मातेचे नाव आहे. तिने गुरुवारी (२१ मे) सकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला घराच्या मागे असलेल्या डाकेमळा येथील विहिरीत टाकले. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांना पुण्याच्या एका सामाजिक संस्थेमार्फत मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. दरम्यान, नातेवाईकांनी त्या लहान बालिकेवर धार्मिक रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कारही केल्याचे पुढे आले. निरीक्षक चव्हाण यांनी खोलवर तपास केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
आरोपीस अद्याप अटक नाही
- बालिकेच्या खुनाचा हा प्रकार २१ मे रोजी घडला. नातेवाईकांनीदेखील हा प्रकार लपवून ठेवला. मृत बालिकेवर अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले होते. शहर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तपासाअंती अन्य गोष्टी समोर येतील.''
नितीन चव्हाण, पोलिस निरीक्षक.
बातम्या आणखी आहेत...