आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या मुलांनी निराधार केलेल्या माउलीची न्यायासाठी याचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पतीच्या निधनानंतर तिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत दोन्ही मुलांना वाढवले. "त्या' माउलीने आयुष्यभर कष्ट उपसल्यामुळे दोन्हीही मुले अाज चांगल्या हुद्द्यावर

आहेत. आता मात्र तिच्या उतारवयात कृतघ्न होत दोन्ही मुलांनी तिला घराबाहेर काढले अाहे. त्यामुळे निराधार झालेल्या "त्या' माउलीला अखेर पोटगीसाठी न्यायालयाचे

दरवाजे ठोठावण्याची वेळ आली आहे. न्यायालयाने तिच्या दोन्ही मुलांना न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

पुरुष हक्क समितीचे अध्यक्ष अॅड. शिवाजी कराळे यांनी निराधार माउलीच्या वतीने न्यायालयात म्हणणे मांडले आहे. न्यायालयात दाद मागणाऱ्या माउलीचे वय ७८ आहे.

तिला एकूण चार मुले होती. त्यापैकी दोन लहानपणी आजारपणामुळे दगावली. नंतर पतीचेही निधन झाले. परिस्थितीशी सामना करीत तिने दोन्ही मुलांना सांभाळले.

दोघांनाही चांगले शिक्षण देत स्वत: हालअपेष्टा सहन केल्या. त्या मुलांनीही चांगले शिक्षण घेत आपापल्या क्षेत्रात चांगल्या हुद्द्यापर्यंत मजल मारली. मोठा मुलगा

सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त होऊन वकिली व्यवसाय करीत अाहे, तर छोटा मुलगा शिक्षक आहे.पण, उतारवयातही त्या माउलीची संकटांनी पाठ सोडलेली नाही. काही दिवसांपूर्वी शहरात पार पडलेल्या पुरुष हक्क समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनाविषयी या माउलीने कुठेतरी ऐकले. अन् तिने समितीकडे धाव घेतली.

पुरुष हक्क समितीचे अध्यक्ष अॅड. शिवाजी कराळे यांनी निराधार माउलीच्या वतीने जिल्हा न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला आहे. न्यायालयाने हा दावा दाखल

करून घेत येत्या २० डिसेंबरला दोन्ही मुलांना न्यायालयात समक्ष उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तशी नोटीस संबंधित मुलांना पाठवण्यात आली

आहे. आयुष्यभर दु:खांनी पाठ सोडली नाही. आता निदान उतारवयात, तरी त्या माउलीला चार सुखाचे दिवस वाट्याला यावेत, म्हणून आपण निराधार महिलेच्या वतीने

न्यायालयात काम पहात आहोत, असे अॅड. शिवाजी कराळे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

धाकट्या सुनेने दाखल केला छळाचा खटला
सध्यावकिलीचा व्यवसाय करीत असलेल्या तिच्या मोठ्या मुलाने २० वर्षांपूर्वीच तिला घराबाहेर काढले होते. त्यामुळे ती लहान मुलाकडे रहात होती. पण, धाकट्या सुनेने

तिच्यावर विवाहितेच्या छळाचा खटला दाखल केला. आता अलीकडेच काही महिन्यांपूर्वी या माउलीला धाकट्या मुलानेही घराबाहेर काढले. सध्या ती निराधार अवस्थेत

दिवस कंठत आहे.