आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन चिमुरड्या लेकींसह आईची विहिरीत आत्महत्या; राहुरी तालुक्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी- तालुक्यातील खडांबे खुर्द येथील सुवर्णा कल्हापुरे (२९ वर्षे) या विवाहितेने आपल्या दोन छोट्या मुलींसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुवर्णा आपल्या पतीला बाहेर जाऊन येते, असे सांगून निघाली. आपल्या मुली अक्षता (१० वर्षे) आराध्या (४ वर्षे) यांना तिने सोबत घेतले. बराच वेळ झाला, तरी पत्नी मुली घरी आल्या नाहीत, म्हणून तिच्या पतीने परिसरात शोध घेण्यास सुरूवात केली. सकाळी १० वाजता घरापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पडिक विहिरीत त्या तिघींचे मृतदेह पाण्यात आढळले. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड यांच्यासह राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे नरेंद्र मोरे विलास गडाख, राजेंद्र पवार, बाळासाहेब पवार, संतोष डागवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. किरण हरिचंद्रे, गणेश पारे, उदय खेडकर, गंगा कारले, बाळू लांडगे, गणेश कलापुरे या तरुणांनी तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. 


मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे आणण्यात आले. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, शिवाजीराव गाडे, रावसाहेब खेवरे यांनी तेथे येऊन घटनेची माहिती घेतली. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, सतीश शिरसाठ यांच्यासह हवालदार दिलीप तुपे, आदिनाथ बर्डे, बंडू बहिर, संजय राठोड यांनी पंचनामा केला. राहुरी पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून ही घटना अपघात की घातपात याचा तपास पोलिस करत आहेत.

 
सायंकाळी राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत कुणाची तक्रार दाखल झालेली नाही. 


सुवर्णा उच्चशिक्षित 
सुवर्णाउच्चशिक्षित होती. तिचे माहेर टाकळीमिया येथील आहे. पती युनियन बँकेच्या राशीन शाखेत शाखाधिकारी आहेत. चार महिन्यांपूर्वी राजकोट येथून त्यांची बदली झाली. सुटीसाठी ते आपल्या गावी खंडाबे येथे आले होते. सकाळी सुवर्णा दोन्ही मुलींना घेऊन शेताकडे जाताना नातेवाईकांनी पाहिले होते. 

बातम्या आणखी आहेत...