आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकली चोरणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस; दोघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मोटारसायकली इलेक्ट्रिक मोटारी चोरून कमी किमतीत त्यांची विक्री करणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस अाणले. अमोल नवनाथ कणसे (दिवटे, ता. शेवगाव) गणेश काजळे (वाडेगव्हाण, ता. शेवगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शेवगाव हद्दीत फरार आरोपींची शोधमोहिम सुरु असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना या रॅकेटची कुणकुण लागली. हे दोघे आरोपी मोटारसायकली इलेक्ट्रिक मोटारींची चोरी करत. चोरलेला मुद्देमाल ते स्वत:च्या घरात ठेवत नंतर परिसरातील ग्राहक शोधून त्यांना कमी किमतीत मोटारसायकल इलेक्ट्रिक मोटारींची विक्री करत. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी कणसे काजळे यांच्या घरी जाऊन झडती घेतली.

पोलिसांच्या छाप्यात दिवटे शिवारातील आनंदनगरमध्ये राहत असलेल्या अमोल कणसे याच्या घरात विविध कंपन्यांच्या मोटारसायकली एक इलेक्ट्रिक मोटार असा लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला. अधिक चौकशी केली असता त्याने लोणावळा शेवगाव परिसरातून हा मुद्देमाल चोरुन आणल्याची कबुली िदली. पोलिसांनी दोघांनाही अटक करुन शेवगाव पोलिस ठाण्यात हजर केले. या गुन्ह्याचा तपास शेवगाव पोलिस करत आहेत.

पंधरा दिवसांत आठ चोरांना अटक
स्थानिकगुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांत आठ मोटारसायकलचोरांना अटक केली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण ३२ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामध्ये बजाज पल्सर, स्प्लेंडर प्लस, महिंद्रा सँटो, हीरो होंडा डिलक्स, पॅशन प्रो, एफ झेड यामाहा कंपनीच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. या रॅकेटमधील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.