आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याला जाणारे पाणी अडवणारे शिवसेनेचे खासदार वाकचौरेंना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मराठवाड्याला जाणारे प्रवरेचे पाणी थांबवण्यासाठी निळवंडे धरण स्थळावर गेलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास निळवंडे धरणावर घडली.

दुपारी साडेतीनच्या सुमारास वाकचौरे, शिवसेना, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते निळवंडे धरणस्थळावर आले. प्रवरेवरील पुलावर सरकारच्या पाणी सोडण्याच्या धोरणाच्या निषेधाची सभा घेतली. संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, प्रवरा विभागप्रमुख रामहारी तिकांडे, श्रीरामपूरचे उपजिल्हा प्रमुख अशोक थोरे, नेवासेचे उपजिल्हाप्रमुख रामदास गोल्हाळ आदींची भाषणे झाली. कार्यकर्त्यांनी निळवंडे धरणाच्या यांत्रिक विभागाकडे धरणाचे सुरू असलेले आवर्तन बंद करण्यासाठी आगेकूच केली. त्यावेळी पोलिसांनी वाकचौरेंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून वाकचौरे व कार्यकर्त्यांना सोडून दिले. यावेळी दोन पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, 25 पुरुष व महिला पोलिस कर्मचारी व शिघ्र कृती दलाची तुकडी तैनात होती.

जिल्ह्यातील मंत्र्यांची मतदारांशीच प्रतारणा

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदे वाचवण्यासाठी मतदारांशीच प्रतारणा केली आहे, अशी टीका वाकचौरे यांनी केली. त्यांनी प्रसंगी मंत्रिपदे पणाला लावून मतदारांचे हित जोपासण्यासाठी पुढे आले पाहिजे. मराठवाड्यातील सर्व नेते वाद विसरून पाणी मिळवण्यासाठी एक होतात. तेव्हा नगर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे.’’ भाऊसाहेब वाकचौरे, खासदार.