आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार वाकचौरेंना मारहाण, पवारांच्या ताफ्यावर दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षांतर केल्याचे पडसाद सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये उमटले. बैठकीसाठी आलेल्या वाकचौरे यांना काही तरुणांनी पोलिस बंदोबस्त असतानाही मारहाण केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला. तर नगर जिल्हय़ाच्या दौर्‍यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावरही दगडफेक झाली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये होती. बैठकीस वाकचौरे उपस्थित होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ते खाली आले. त्यांच्याबरोबर दोन सुरक्षा रक्षक व शहर पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी होते. मागून आलेल्या काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला व मारहाण केली.
खुनी हल्ला : यापूर्वीही आपल्याला फोन, व्हॉट्सअँपवरून धमक्या आल्याचे सांगून हल्ल्यामागे शिवसेना असल्याचा आरोप वाकचौरेंनी केला.वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसैनिकांत संतापाचे वातावरण आहे.

तिघांना अटक
शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे अमोल कवडे, रमेश काळे यांना अटक करण्यात आली असून भाऊसाहेब हासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे म्हणाल्या.