आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MP Dilip Gandhi And Agarkar Group Fight Each Other

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार दिलीप गांधी व आगरकर गटातील तेढ वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गांधी आणि आगरकर
नगर - पदाधिका-यांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी शहर भाजपमधील पाच पदाधिका-यांना पदमुक्त केल्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून पक्षात असलेली गांधी विरुद्ध आगरकर गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या हकालपट्टी प्रकरणाचा अहवाल प्रदेशने मागवला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांचे काम आगरकर गटाने न केल्याने गांधी गट नाराज झाला होता. या नाराज गांधी गटाने त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढून विधानसभा निवडणुकीत उमेदवार आगरकर यांचे काम केले नाही. या दोन्ही निवडणुकांपासून पक्षातील गांधी गट व आगरकर गट यांच्यात नाराजी होती. त्यानंतर झालेल्या नगर अर्बन बँक व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीतही हे नाराजी नाट्य कायम होते. अर्बन बँकेच्या निवडणुकीत एकाच पक्षातील खासदार व शहर जिल्हाध्यक्ष यांनी स्वतंत्र चूल मांडून गटबाजीचे प्रदर्शन घडवले. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत आगरकर गटाने भिंगारमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी प्रचारसभा बोलवली असताना गांधी गटाने त्याच दिवशी त्याच वेळेला नगर क्लब येथे उमेदवारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला.

यातून दोन्ही गटांतील दरी आणखी वाढत गेली. याच जुन्या नाराजीवरून विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शहर कार्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीत खासदार गांधी व शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. बैठकीमधील वाद वाढत असल्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांना बैठक गुंडाळावी लागली. या सर्व प्रकारानंतर दोन्ही गटांतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले होते.

२ फेब्रुवारी रोजी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी भाजपला शहरात अनुकूल वातावरण आहे. मात्र, काही पदाधिका-यांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करून शहर उपाध्यक्षपदावरून मनेष साठे, अनिल गट्टाणी, शहर जिल्हा चिटणीसपदावरून किशोर बोरा, प्रशांत मुथ्था व युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून सुवेंद्र गांधी यांना पदमुक्त केले. या प्रकारानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. पदमुक्त करण्यात आलेले पदाधिकारी हे गांधी गटाचे आहेत. या प्रकारानंतर गांधी गटाने मात्र मौन पाळले आहे. या हकालपट्टी प्रकरणाची प्रदेश भाजपने दखल घेतली याबाबतचा अहवाल मागवला आहे.

पुढे वाचा