आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस-राष्ट्रवादीचे निमंत्रण धुडकावले;खासदार दिलीप गांधी यांचा गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीत व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी अनेकदा निमंत्रण दिले. मात्र, हे निमंत्रण आपण स्वीकारले नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी गुरूवारी केला.

जिल्हा परिषदेच्या जवळा गटात विविध विकासकामांचा प्रारंभ गांधी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत मोरे, पांडुरंग उबाळे, रवी सुरवसे, मनोज राजगुरू, मनोज कुलकर्णी, कुंडल राळेभात आदी यावेळी उपस्थित होते.

गांधी म्हणाले, जामखेड तालुक्यात आपण अडीच कोटी रुपयांची कामे केली आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 15 कोटी खर्चाची रस्त्याची कामे झाली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा तालुक्यासाठी निधी आणण्यात आला आहे.आगामी काळात मतदारसंघासाठी 150 कोटी रुपयांचा निधी आणणार आहे.

गांधी पुढे म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी राष्ट्रवादीत व विलासराव देशमुख यांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी मला अनेकदा निमंत्रण दिले होते. मात्र, आपण त्यांचे हे निमंत्रण स्वीकारले नाही.

यावेळी गांधी यांच्या हस्ते धोंडपारगाव, राजेवाडी, मुंजेवाडी व डोणगाव येथे सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच रत्नापूर येथे तंटामुक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल गांधी यांच्या हस्ते पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

जवळा येथे गांधी यांचे शाखाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे यांनी स्वागत केले. माजी सभापती श्रीरंग कोल्हे, किसनराव मेहेर, डॉ. पांडुरंग हजारे, हबीब शेख, अब्दुल सय्यद, राजेंद्र महाजन, राजेंद्र गुंदेचा, शांतीलाल कथले आदी यावेळी उपस्थित होते.