आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले खासदार गांधींना काळे झेंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात गारपिटीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या खासदार दिलीप गांधी यांना भाजपच्या एका गटाने काळे झेंडे दाखवून ‘गांधी गो बॅक’च्या घोषणा दिल्या.
खासदार गांधी यांच्या उमेदवारीला जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, आमदार राम शिंदे यांचा विरोध आहे. गुरुवारी दुपारी गांधी आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना भेटण्यासाठी आले होते. खरवंडी येथे भाजपच्या एका गटाने ‘गांधी गो बॅक’, ‘गोपीनाथ मुंडे, ढाकणेंचा विजय असो’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. डॉ. ज्ञानेश्वर दराडे, मालेवाडीचे माजी सरपंच वसंत खेडकर, महारुद्र कीर्तने, माणिक बटुळे, ज्ञानदेव जवरे, रामहरी खेडकर, पांडुरंग गायकवाड, विश्वास खाडे, बापू मोहिते आदींनी गांधी यांना घेराव घालून जाब विचारला. ‘आपण या भागात दुष्काळात मदत केली नाही. यापूर्वी कधीही फिरकला नाही. या भागातून सर्वाधिक मतदान होऊनही तुम्ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच इकडे आलात,’ असे म्हणत कार्यकर्त्यानी निदर्शने केली.
पागोरी पिंपळगाव येथेही कार्यकर्त्यांनी गांधींवर प्रo्नांची सरबत्ती केली. खरवंडी कासार व मुंगुसवाडे येथेही निदर्शने करण्यात आली. सोबतचे अनेक कार्यकर्ते तिसगाव येथून निघून गेल्याने गांधी यांना दौरा आवरता घ्यावा लागला. या वेळी गांधींसमवेत अशोक गर्जे, अशोक चोरमले, विजय मंडलेचा होते.