आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरे दरोडेखोर ते आहेत जे कवडीमोलाने बळीराजाचा ऊस घेतात: खासदार राजू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- कष्टकरी शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी साखर कारखानदारांना सत्ताधाऱ्यांची गरज लागते. शेतकऱ्यांच्या शोषणावर यांचे सगळे काही अवलंबून आहे. खरे दरोडेखोर ते आहेत जे कवडीमोलाने बळीराजाचा ऊस घेतात. उसाच्या प्रत्येक उत्पादनाची चोरी करुन पैसे मिळवण्याचे धंदे करतात. रात्री मळी गुजरातला जाते. त्यातून प्रचंड नफा मिळवण्याचा उद्योग हे कारखानदार करतात, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केली. 


घोटण येथील सभेत शेट्टी म्हणाले, उसाची साखर होईपर्यंत प्रत्येक पातळीवर शेतकऱ्याची लूट होते. कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील कारखान्यांनी कमीत कमी उचल २८५० जास्तीत जास्त ३५०० रुपये भाव दिला. हे केवळ संघटनेने लढा दिल्यानेच घडले. 


खासदार निधीतून घोटण येथे उसासाठी काटा बसवून देतो, असे शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी ऊस लावला नाही, तर कारखानदार काय करणार. जोपर्यंत कारखानदार उसाचा भाव जाहीर करीत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नये, असे खासदार शेट्टी यांनी यावेळी सांगितले. 


गोळीबारातील जखमींचा सत्कार 
सभा सुरु असताना गोळीबारात जखमी झालेले तेलवाडी येथील पांडुरंग दुकळे उध्दव मापारी आले. खासदार शेट्टी यांनी त्यांचा सत्कार केला. या सभेस शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. शेट्टी दुपारी दीडच्या सुमारास आले. तोपर्यंत लोक भर उन्हात बसून होते. अगोदर शेट्टी यांनी घोटणच्या मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. 

बातम्या आणखी आहेत...