कुकाणे -"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?' या भाजपच्या जाहिरातीवर संताप व्यक्त करत सुरक्षित व सुसंस्कृत महाराष्ट्राबद्दल वाईट बोललात, तर आता नेवाशातील महिलांना घेऊन
अमित शहाला बांगड्या घालीन, असा सज्जड दम खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर गडाख यांच्या प्रचारार्थ शनिवारी कुकाणे येथे बाजारतळावर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. या वेळी माजी खासदार यशवंतराव गडाख, विठ्ठल लंघे उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात कांदा, डाळिंबास भाव नाही. आता निवडणुका होऊ द्या, कांदा, डाळिंबास भाव दिला नाही, तर राज्यातील गाड्या, बसेस फोडणार नाही, रस्ता अडवणार नाही, तर दिल्लीत मोदीचा रस्ता अडवणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.