आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी परीक्षेसाठी सहा हजार उमेदवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा रविवारी (29 सप्टेंबर) होत आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या वेळेत शहरातील 17 केंद्रांवर ही परीक्षा होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी शुक्रवारी दिली.

या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे 3 समन्वय अधिकारी, 1 भरारी पथक, 17 उपकेंद्र प्रमुख, 17 सहायक, 62 पर्यवेक्षक, 62 पर्यवेक्षकांचे सहायक, 263 लिपीक, 17 शिपाई, 62 पाणीवाटप कर्मचारी व 21 वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 11 पर्यंत येणार्‍या उमेदवारांनाच परीक्षेला प्रवेश दिला जाईल. उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या शाईचे बॉलपॉईंट पेन वापरणे आवश्यक आहे. मोबाइल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन यासारखी साधने परीक्षा केंद्रात आणण्यास बंदी आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 100 मीटर परिसरातील एसटीडी बूथ, फॅक्स व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यासाठी 144 (3) कलम लागू करण्यात आले आहे.

सर्व उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षेपूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या पुराव्यासह आयोगाच्या विक्रीकर भवन, माझगाव येथील कार्यालयात संपर्क साधून प्रवेशपत्र मिळवावे,असे सांगण्यात आले.