आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जत तालुक्यामध्ये महावितरणची अनागोंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - महावितरण कंपनीच्या बिल वितरण विभागाच्या अनागोंदीला तालुक्यातील जनता वैतागली आहे. चुकीची बिले ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. थकबाकीच्या नावाखाली ग्रामीण भागात 9 तासांहून अधिक भारनियमन केले जात असल्याने नियमित वीजबिल भरणार्‍या ग्राहकांना अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे ग्राहक संताप व्यक्त करत असून या मनमानीला लगाम घालण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील विभागावर मीटर रीडिंग व बिले वितरणाची कामे कमिशन तत्त्वावर एका खासगी कंपनीला देण्यात आली आहेत. त्या एजन्सीचे कर्मचारी एका ठिकाणी बसून दोन महिन्यांपासून अवाजवी बिले ग्राहकांना देत आहेत. या प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली असता पाहू, करू असे मोघम उत्तर दिले जाते. या प्रकाराने वीजबिले न भरण्याचा ग्राहकांनी पवित्रा घेतला, परंतु त्याचा परिणाम उलट झाला असून चालू महिन्यात मे महिन्यांची बिले थकबाकी व्याजासह आली आहेत. ही बिले देय तारखेनंतर देण्यात आली असून बिले न भरल्यास कनेक्शन तोडण्याचा दम कर्मचारी देत आहेत.

व्यावसायिकांना स्वतंत्र भारवाहक सक्तीचे असताना त्यांचे वीजजोड घरगुती ग्राहकांच्या वाहिकेवर देण्यात आले आहेत. त्यामुळे घरगुती वापराला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात सध्या पहाटे 5.30 ते रात्री 8.30, सकाळी 11 ते दुपारी 3 व संध्याकाळी 7 ते 10 असे 9 तास भारनियमन सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.