आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन पावसाळ्यात भारनियमनाचे झटके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पावसानेओढ दिल्याने कृषिपंपांच्या वीजवापरात वाढ झाली आहे. त्यामुळे विजेची मागणी १६ हजार ते १६ हजार ५०० मेगावॅटपर्यंत वाढली आहे. त्यातच चार हजार मेगावॅट वीजनिर्मिती करणारा परळी येथील प्रकल्प बंद पडला. त्यामुळे मागणीच्या तुलनेत विजेच्या पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाल्याने महावितरणने सोमवारपासून (१३ जुलै) सर्वच गटांत पाच ते सात तासांचे भारनियमन सुरू केले आहे.

पाऊस लांबल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना विजेच्या उपलब्धतेतही घट होऊन नागरिकांना ऐन पावसाळ्यात भारनियमनाचे चटके सहन करावे लागणार आहेत. महानिर्मितीचे परळी येथील सर्व वीजनिर्मिती संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ५०० मेगावॅट वीज अपेक्षित असताना त्यातही घट झाली आहे. ३८०० मेगावॅट वीज सध्या मिळत आहे. पवन ऊर्जेतूनही १८०० ते २२०० मेगावॉट वीज अपेक्षित असताना ती एक हजार मेगावॅटपर्यंत घटली आहे. तिरोडा येथील अदानी पॉवरचा ६६० मेगावॅटचा एक संच आणि अमरावती येथील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाल्याने सकाळी पावणेदहापासून राज्यात भारनियमनास सुरुवात झाली.

केंद्रीय वीजप्रणालीतून (ग्रीड) वीज घेऊनही तूट राहिल्याने सर्वच ग्राहकांसाठी भारनियमन करण्यात आले. भारनियमन आटोक्यात ठेवण्यासाठी तातडीने काही तासांसाठी सुमारे १००० ते १२०० मेगावॅट वीज विकत घेण्यात आली. कोयना प्रकल्पातील २५० मेगावॅटचा एक संच सुरू झाल्याने सायंकाळपर्यंत विजेची उपलब्धता वाढून भारनियमन कमी झाले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा मागणी वाढल्याने शहरात सकाळी अडीच तास सायंकाळी अडीच तास भारनियमन करण्यात आले. कृषिपंपांना भारनियमन करता त्यांना निर्धारित वेळेत विजेचा पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

दरम्यान, "पॉवर सरप्लस‘ असा गाजावाजा करणाऱ्या महावितरणने ग्राहकांची गैरसोय केली आहे. १५ दिवसांत कृषिपंपांच्या वाढलेल्या वीज वापरामुळे १४ हजार मेगावॉटवरून विजेची मागणी १६ हजार ५०० मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. अघोषित आणि कोणतीही सूचना देता भारनियमनाचा चटका ग्राहकांना बसत आहेत. अचानकपणे सुरू झालेल्या भारनियमनामुळे नगरकरांच्या संतापात भर पडली आहे. सोमवारी दीड तासांचे, तर मंगळवारी तब्बल दोन टप्प्यात पाच तासांचे भारनियमन झाले. यामुळे नगरकरांमध्ये भारनियनमनाच्या वेळेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

कृषिपंपांचा वापर वाढला
पावसानेदडी मारल्याने पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंपांचा वीजवापर वाढला आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत विजेची मागणी तीन ते साडेतीन हजार मेगावॅटने वाढली आहे. वीजनिर्मिती केंद्रेही बंद पडल्यामुळे राज्यभर तातडीचे भारनियमन करावे लागले. एकदम तीन हजार मेगावॅट विजेचा तुटवडा झाल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीचे भारनियमन करण्याचे नियोजन करण्यात आले. मागणी पुरवठ्याचा मेळ बसत नसल्याने या भारनियमनाची वेळ महावितरणवर आली आहे.

नागरिकांचा गोंधळ
नगरशहरात कुठेही भारनियमन नव्हते. मात्र, दोन दिवसांपासून वीज जात असल्याने, तसेच तात्पुरत्या भारनियमनाबाबत नागरिकांना कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी महािवतरणचे कॉल सेंटर, सर्कल हाऊसकडे विचारणा केली; मात्र तेथील कर्मचाऱ्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने नागरिकांच्या गोंधळात अधिकच भर पडली.

तात्पुरते भारनियमन
सोमवारपासून शहरात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. मंगळवारी मागणी वाढल्याने यात वाढ करण्यात आली. हे तात्पुरते भारनियमन आहे. पाऊस नसल्याने कृषिपंपांचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढल्याने भारनियमन करण्यात येत आहे. '' एस.एस. जाधव, कार्यकारीअिभयंता, महािवतरण.
बातम्या आणखी आहेत...