आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचार्‍यांनो, वसुली दाखवा अन् बोनस घ्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्या ट्रान्सफार्मरवर शंभर टक्के वसुली आहे, त्या तांत्रिक कामगारांना शंभर टक्के बोनस देण्यात येईल. जर पूर्ण वसुली नाही, तर तेथे वीज तोडल्याचा पुरावा असावा म्हणजेच त्या ट्रान्सफार्मरवरील लोडही कमी झालेला असावा, असा निकष महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) अजय मेहता यांनी लावला आहे. मात्र, याला राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा विरोध असून यावर तोडग्यासाठी सोमवारी (14 ऑक्टोबर) महावितरणच्या मुंबईतील प्रकाशगड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांच्या कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस देण्यात यावे, अशी मागणी राज्य वीज तांत्रिक कामगार तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी शिष्टमंडळासह व्यवस्थापकीय संचालक मेहता यांच्याकडे केली. यावर मेहता म्हणाले, बोनसची प्रथा मी बंद करणार नाही. पण ज्या ट्रान्सफार्मरवर शंभर टक्के वसुली आहे, त्या कामगारांना बोनस देण्यात येईल. जर पूर्ण वसुली नाही, तर तेथे वीज तोडल्याचा पुरावा असावा म्हणजेच त्या ट्रान्सफार्मरवरील लोडही कमी झालेला असावा. ज्या तांत्रिक कामगारांकडील ट्रान्सफार्मरवरील वसुली जितके टक्के असेल, त्या कामगारांना त्याच प्रमाणात सानुग्रह अनुदान, बोनस दिला जाईल.

याबाबत निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांनी 14 ऑक्टोबर रोजी सर्व संघटनांची बैठक बोलावली आहे.