आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Msrtc Driver Betan By Shivsena Activist In Nagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगमनेरमध्ये नगरसेवकांची बसचालकाला मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - एसटीचालकाला शिवसेना व भाजपच्या दोघा नगरसेवकांनी बुधवारी मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. पोलिसांनी दोघा नगरसेवकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर साडेतीन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

संगमनेर आगाराची नगर-नाशिक बस (एमएच 14 बीटी 3347) घेऊन चालक शेख अल्ताफ दहाच्या सुमारास बसस्थानकात येत होते. त्याच वेळी मारुती कार बाहेर येत होती. तिला चुकवण्याचा शेख यांनी प्रयत्न केला. कारमधील भाजपचे नगरसेवक राधावल्लभ कासट आणि शिवसेनेचे नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी गाडी थांबवून चालकाला विचारणा केली. त्याची परिणती मारहाणीत झाली. आगारातील कर्मचार्‍यांनी धाव घेतली. नंतर नगरसेवकांनी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

दरम्यान, आगारातील कर्मचार्‍यांनी संबंधित नगरसेवकावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. आगारातून बाहेरगावी जाणार्‍या बसेस बंद करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामीण भागात जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली.

पोलिस व प्रशासनाला आमचे देणे-घेणे नाही
चुकीची घटना अथवा अपघात घडल्यास कर्मचार्‍यांना त्रास होतो. अशावेळी एसटीचे प्रशासन आणि पोलिस यांना आमच्याबद्दल काहीही देणेघेणे नसते. अपघात झाला, तर जबाबदारी कोणाची? - ए. एल. थोरात, चालक