आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी-पदाधिकारी दालनांवर वारेमाप खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील गरीब गरजू जनता घरकुलासाठी शासनदरबारी खेटा घालताना दिसते, पण जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या दालन निवासस्थानाच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी वारेमाप खर्च सुरूच आहे. मागील चार वर्षांत बोटावर मोजण्याइतक्या दालनांवर कोटी २१ लाख खर्च करण्यात आला.

शासनाकडून विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यातील काही योजना केवळ निधी नसल्यानेही अडकून पडतात. निराधार गरिबांसाठी घरकूल देण्याचीही योजना आहे. घरकुल मंजूर होऊनही केवळ जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना आजही निवारा नाही. ही वस्तुस्थिती असताना अधिकारी पदाधिकारी दरवर्षी मनमानी पद्धतीने दालनाच्या देखभाल दुरुस्तीवर खर्चाची तरतूद करतात. "दिव्य मराठी'ने २०१२ ते २०१५ या कालावधीत पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या दालनावर झालेल्या खर्चाची माहिती घेतली असता या दालनांवर मोठा खर्च करण्यात आल्याचे दिसून येते.

सामान्य माणसाला घराची साधी रंगरंगोटी केल्यानंतर ते वर्षे पुन्हा रंगरंगोटी करण्याची गरज भासत नाही. पण अधिकारी पदाधिकाऱ्यांची दालने आधीच चकचकीत असताना त्यावर दरवर्षी खर्च केला जातो. हा खर्च वारेमाप असल्याची भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली आहे.

नवीन पदाधिकारी निवडी झाल्यानंतर दालनाची रंगरंगोटी करून नवीन खुर्च्या ठेवल्या जातात. पुन्हा निवड झाली की पुन्हा रंगरंगोटी असा खर्च केला जातो. अनावश्यक खर्च टाळून तो लोककल्याणासाठी वापरावा अशीही काही सदस्यांची मागणी आहे. पण केवळ आलिशान आणि चकचकीत दालने ठेवण्याचा पदाधिकाऱ्यांच्या अट्टहासापोटी हा खर्च सुरू आहे.

सन २०१२ ते २०१५ या कालावधीत कोटी २० लाख ९५ हजार रुपये खर्च जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या दालनावर करण्यात आला आहे. सन २०१५-२०१६ या वर्षीच्या अंदाजपत्रकातही कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तरतुदीपेक्षा जास्त खर्च झाल्याचेच समोर आले आहे. त्यामुळे सत्ता कुणाचीही असो, पण दालनावरील वारेमाप खर्चाची परंपरा थांबवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

असा झाला खर्च
२०१२-१३: कोटी २२ लाख
२०१३-१४ : ८९ लाख २२ हजार
२०१४-१५ : कोटी ४० लाख
१५-१६ : (तरतूद) - कोटी २० लाख