आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात हजार कर्जदारांनी थकवले ५८ हजार कोटी, व्यंकटचलन यांची पत्रपरिषदेत माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशभरातील हजार ३५ बड्या कर्जदारांनी बँकांचे तब्बल ५८ हजार ७९२ कोटी रुपये जाणीवपूर्वक थकवले आहेत. त्यात विजय मल्ल्या यांच्यासारख्या उद्योजकांचा समावेश आहे. त्यांच्याकडील थकीत असलेला पैसा जनतेचा आहे. त्यामुळे बँकांचे जाणीवपूर्वक हजारो कोटी रुपये थकवणाऱ्यांची यादी रिझर्व्ह बँकेने जाहीर करावी, अशी मागणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशनचे सचिव सी. एच. व्यंकटचलन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. रिझर्व्ह बँकेने ही यादी जाहीर करावी, यासाठी १४ मार्चला असोसिएशनच्या वतीने देशभर निदर्शने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सेंट्रल बँक ऑफ एम्प्लॉईज असोसिएशनचे अधिवेशन नगरमध्ये पार पडले. यावेळी वेंकटचलन यांनी कर्ज बुडव्यांमुळे देशभरातील बँका कशा अडचणीत आल्या, ते स्पष्ट केले. याप्रसंगी असोसिएशनचे रामबाबू, हेमंत जामखेडकर, देविदास तुळजापूरकर, जगदीश भावठणकर, सुदर्शन नायर, उल्हास देसाई आदी उपस्थित होते. व्यंकटचलन म्हणाले, बँकिंग उद्योग अडचणीत आला आहे. बँकांमध्ये ८५ लाख कोटी एवढा पैसो असून तो सर्व जनतेचा आहे. या पैशाला सरकारने सुरक्षा दिली पाहिजे. विजय मल्ल्या यांच्यासारख्या बड्या उद्योजकांनी जनतेचा हा पैसा बुडवला आहे. रिझर्व्ह बँकेसह सरकार कार्पाेरेट क्षेत्रामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँक सरकार मल्ल्या यांच्यासारख्या कर्ज बुडव्यांना पाठीशी घालत आहे.
त्यासाठी रिझर्व्ह जाणीवपूर्वक कर्ज बुडवणाऱ्यांची यादी जनतेसमोर जाहीर करावी; अन्यथा अाम्हीच ही यादी जाहीर करू, असा इशारा व्यंकटचलन यांनी दिला. सुमारे सात हजार बड्या कर्जदारांनी बँकांचे जाणीवपूर्वक ५८ हजार ७९२ कोटी रुपये थकवले आहेत. यात तब्बल सहा लाख कोटींचा घोटाळा झाला असल्याचा अारोपही व्यंंकटचलन यांनी केला आहे. थकीत कर्जाचे हे प्रमाण असेच वाढत राहिले, तर बँका िकती काळ तग धरणार, याबाबत शंका आहे. त्यामुळेच असोसिएशनच्या माध्यमातून कर्ज थकवणाऱ्यांच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारीला बंद पाळून १४ मार्चला देशभर निदर्शने करण्यात येतील.

घरासमोर निदर्शने
संघटनेच्या माध्यमातून बड्या थकबाकीदारांना समूहाने भेटी देण्यात येणार आहेत. थकबाकीदारांची कार्यालये घरांसमोर बँक कर्मचारी निदर्शने करणार आहेत. जाणीवपूर्वक कर्ज थकवणे, हा मोठा गुन्हा समजला जावा, यासाठी संघटना सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे व्यंकटचलन यांनी सांगितले.

मुद्रा लोन हा घोटाळा
केंद्र सरकारने सुरू केलेली मुद्रा लोन योजना हा एक मोठा घोटाळा आहे. बँकांवर दबाव आणून चुकीच्या लोकांना पैसे देण्यास सरकार बँकांना मजबूूर करत आहे. कोणतीही गॅरंटी घेता दिलेला हा पैसा वसूल कसा करायचा, असा प्रश्न बँकांसमोर असल्याचे व्यंकटचलन यांनी सांगितले
बातम्या आणखी आहेत...