आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांसाठी गुरुवारपासून खुले होणार मूळ विशाल गणेशाचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणेश मंदिराचा गाभारा २६ महिन्यांनंतर उघडला जाणार आहे. त्यामुळे विशाल गणेशाचे दर्शन गुरुवारपासून (२४ ऑगस्ट) सर्वांना खुले होणार आहे. त्यासाठी २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान धार्मिक विधी प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे, अशी माहिती माळीवाडा पंचमंडळ धर्मफंडचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

या सोहळ्याबद्दल माहिती देताना आगरकर म्हणाले, की साडे नऊ कोटींचा खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या आत बाहेर शुभ्र संगमरवर वापरण्यात आले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या शेजारीच गणेश पुराणातील प्रसंगावर आधारित शिल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. 

या गणेश मूर्तीवर वर्षानुवर्षे लावण्यात आलेल्या शेंदुरामुळे मूर्तीची उंची साडेबारा फूट झाली होती. आता तो शेंदूर काढून टाकल्याने उंची बारा फुटांवर आली आहे. आता ही मूर्ती मूळ स्वरूपात भक्तांसमोर येणार आहे. मूर्तीवर लावलेला दोन टन शेंदूर काढून टाकण्यात आल्याची माहिती अॅड. आगरकर यांनी दिली. भक्तांनी दिलेल्या देणग्यांतून विशाल गणेश मंदिरासाठी १०० किलो चांदीचा दरवाजा तयार केला आहे. तो सोमवारीच बसवण्यात येणार आहे. मंदिरात ८० किलो वजनाचे मखर बसवण्यात येणार आहे. तया वेळी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, रामकृष्ण राऊत, पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबिरे, बाबासाहेब सुडके, हरिश्चंद्र गिरमे, बापूसाहेब एकाडे, गजानन ससाणे, चंद्रकांत फुलारी, ज्ञानेश्वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, प्रकाश बोरुडे आदी उपस्थित होते.
 
धार्मिक सोहळ्याचे यजमानपद धामेजा यांना 
२२२४ ऑगस्ट दरम्यान येथे प्रधानसंकल्प, देवता स्थापना, विशाल गणेश मूर्तीस जलाधिवास, स्थापित देवतांचे पूजन, अग्निमंथन, नवग्रह योग, विशाल गणेश मूर्तीला १०८ कलशांचे महास्नान, विशेष हवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा बलिदान पूर्णाहुती महाआरती हे कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याच्या यजमानपदाचा बहुमान विशाल गणेशाचे ४० वर्षांपासून भक्त असलेले जेठानंद धामेजा यांना देण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...