आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुळा’ 75 टक्के; ‘भंडारदरा’तून 3884 क्युसेकने जायकवाडीकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा- पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मुळा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पुन्हा वाढली आहे. धरणाचा साठा रात्री ७५ टक्के झाला. भंडारदरा धरणातही पाण्याची पुन्हा आवक सुरू झाली आहे. भंडारदरा धरणातून दोन हजार ९१२ क्युसेकने पाणी निळवंडेत वाकी जलाशयातून बाहेर पडणारे एक हजार २२ क्युसेक मिळून तीन हजार ८८४ क्युसेकने पाणी जायकवाडी धरणाकडे जात आहे. 

मुळा धरणात गुरुवारी सायंकाळी १९ हजार २०५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणाचा पाणीसाठा १८ हजार ५०२ दशलक्ष घनफूट (७१ .१६ टक्के) होता. पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस पाहता जिल्ह्यातील सर्वांत मोठे असलेले हे धरण यंदा १५ ऑगस्टच्या दरम्यान पूर्ण भरणाची शक्यता वाढली आहे. धरणात येणाऱ्या पाण्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. पण, लाभक्षेत्रात अजिबात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगाम पावसाअभावी धोक्यात आला आहे. कोतूळजवळ नदीचा विसर्ग एक हजार ५१३ क्युसेक आहे. 

भंडारदरा धरण यंदा जुलै महिन्यातच तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभागाकडून जाहीर करण्यात आलेे. सध्या धरणात दहा हजार ७०५ दशलक्ष घनफूट पाणी ठेवून उर्वरित पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणातून एकूण दोन हजार ९१२ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेमार्गे हे पाणी जायकवाडी धरणात जात आहे. भंडारदरा पाठोपाठ आढळा धरणही लवकर भरले आहे. या धरणाची क्षमता एक हजार ६० दशलक्ष घनफूट आहे. ही धरणे जुलैमध्येच भरतील, हा दैनिक दिव्य मराठीचा अंदाज खरा ठरला आहे. 

निळवंडे धरणाचा पाणीसाठाही सात हजार ९०९ दशलक्ष घनफूट झाला आहे. धरणाची क्षमता आठ हजार तीनशे दशलक्ष घनफूट आहे. धरणांचा पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे भाताची रोपे सातत्याने पाण्याखाली राहून पिवळी पडू लागली आहेत. पावसाने काही दिवस उघडीप देण्याची प्रतीक्षा आदिवासी शेतकरी करत आहेत. कारण या आदिवासींचे कितीही नुकसान झाले, तरी त्यांना भरपाई मिळत नाही, असा अनुभव आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. 

तीन ठिकाणी तीन हजार 
मिलिमीटरपेक्षाअधिक पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रापैकी अनुक्रमे रतनवाडी, पांजरे भंडारदरा येथे पावसाने तीन हजार मिलिमीटरचा ठप्पा पार केला आहे. रतनवाडी येथे तर शुक्रवारीच चार हजार मिलिमीटरचा टप्पा लवकरच गाठला जाणार आहे. रतनवाडी येथे गुरुवारी सकाळी ५२ मिलिमीटर (एक जून पासून एकूण ३९८६ मिलिमीटर), पांजरे येथे ४२ (३०८२), घाटघर येथे ४४ (३३१४), भंडारदरा येथे ३७ (२३०३) वाकी येथे १७ (२१६३) मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. 
बातम्या आणखी आहेत...