आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरचा पाणीपुरवठा आवर्तनामुळे धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मुळाधरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने नगर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे. सध्या धरणात अडीच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून येत्या दहा दिवसांत आवर्तनावर दोन टीएमसी पाणी खर्च होणार आहे. इतर व्यय वगळता आवर्तनाच्या शेवटी धरणातील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शहर पाणीपुरवठा योजनेच्या उपसा पंपांची क्षमता आताच कमी झाली असून आवर्तनाच्या शेवटी मंदावलेल्या उपश्याचा परिणाम नगरकरांना सहन करावा लागेल.
मुळा धरणात गेल्या वर्षी चांगला पाणीसाठा झाला होता. २६ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात २५.१३ टीएमसी पाणीसाठा होता. सिंचनाच्या आवर्तनासाठी यातील साडेअकरा टीएमसी पाणी सोडण्यात आले. गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या आदेशानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साडेतीन टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी देण्यात आले. १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजना राखीव पाण्याच्या नियोजनानंतर धरणात अवघे ८०० दशलक्ष घनफूट (०.८ टीएमसी) पाणी शिल्लक रहात असल्याने शेतीसाठी पाणी सोडण्याचा प्रश्न येत नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या आग्रहावरून पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.
या निर्णयानुसार सोमवारी (२५ मे) धरणाच्या उजव्या डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात आले. उजव्या कालव्यातून १७०० डाव्या कालव्यातून ३०० दशलक्ष घनफूट असे एकूण दोन टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे आवर्तन शेतीच्या सिंचनासाठी सोडण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी दिली होती. मात्र, पाटबंधारे विभागातील सूत्रांनी हे सिंचनाचे आवर्तन नसल्याची माहिती "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. टंचाई परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचे शेतीचे उद््भव चार्ज करण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या धरणात टीएमसी पाणीसाठा आहे. आवर्तनासाठी दोन टीएमसी पाणी याच कालावधीतील इतर व्यय गृहित धरता दहा दिवसांत धरणातील पाणीसाठा ४८०० दशलक्ष घनफुटांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. साडेचार टीएमसी मृतसाठा वगळता अवघे अडीचशे ते तीनशे दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी शिल्लक राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या उपसा पंपांचे फूटव्हॉल्व्ह १७५२ फुटांपर्यंत खाली आहेत. फूटव्हॉल्व्हच्या खाली मृतसाठा सुरू होतो.
सध्या धरणाची पाणीपातळी १७६४ फुटांवर आहे. आवर्तनामुळे ही पातळी झपाट्याने घसरणार आहे. त्यातच पाणी योजना, आरक्षण बाष्पीभवनातूनही पाणी खर्च होणार आहे. पाणीपातळी खालावल्याने अतिरिक्त पंप लावून शहराची गरज भागवण्याचा प्रयत्न सध्या मनपा प्रशासनाकडून सुरू आहे. फूटव्हॉल्व्हवरील पाणी कमी होईल, तशी पंपाची क्षमता क्षीण होत जाईल. ऐनवेळी फूटव्हॉल्व्ह खाली सोडून शहराची पाण्याची गरज भागवण्याची तयारी मनपा प्रशासनाला ठेवावी लागणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, गेल्यावर्षी उन्हाळी आवर्तन नाही...
बातम्या आणखी आहेत...