आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरण भरण्यासाठी गरज १ टीएमसी पाण्याची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - मुळा धरणाची पाणी आवक मंदावल्याने सध्या धरणात २५ हजार १०० दलघफू पाणीसाठा आहे. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघे एक टीएमसी पाण्याची गरज. २६ हजार दलघफू पाणीसाठ्याचे जिल्‍ह्यात सर्वात मोठे धरण म्हणून मुळाकडे पाहिले जाते.
जिल्‍ह्याची पिण्‍याची व शेतीची तहान मुळा भागवते. मुळा धरणाची जुलै अखेरपर्यंत स्थिती चिंताजनक होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने मुळाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली. मुळा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. मुळा डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडण्यात आले. धरणात समाधानकारक
पाणीसाठा असल्याने पुढील हंगामात शेतीसाठी पाणी मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मुळाधरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी एक टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धरणाचे ११ दरवाजांना ऑईलिंग ग्रीसिंग करण्यात आली आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे कायम आहेत. चार पोलिस व मुळाचे कर्मचारी देखरेखीसाठी
तैनात आहेत.