आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा प्रवरा काठच्या १५३ गावांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जायकवाडीधरणासाठी मुळा धरणातून ३.७ टीएमसी पाणी सोडले जात आहे. मुळा धरण ते जायकवाडी हे अंतर ७० किलोमीटर आहे. या भागात नदीकिनारी असलेल्या राहुरी नेवासे तालुक्यातील ३८ गावांतील सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्राला काहीच लाभ होणार नाही. कारण पाणी सोडण्याच्या पाच दिवसांत वीज बंद राहणार असल्याने पिकांना पाणी देता येणार नाही. विशेष म्हणजे, नगर जिल्ह्यातील ज्या धरणांतून पाणी सोडले जात आहे, त्यातील पाणी विस्थापित होणार नाही, असे आश्वासन जायकवाडी धरण बांधताना सरकारकडून देण्यात आले होते. त्याला सरकारी यंत्रणेचाच भाग असलेल्या गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून हरताळ फासण्यात आला आहे.
भंडारदरा ते जायकवाडी १७० किलोमीटर अंतर आहे. या अंतरात अकोले तालुक्यातील ३२, संगमनेर तालुक्यातील १२, राहाता तालुक्यातील आठ, नेवासे तालुक्यातील १३ गावे आहेत. त्यांतील सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्राचीही अशीच वीज बंद राहणार असल्याने नुकसान होणार आहे. निळवंडे धरणातून एकूण ४.३ टीएमसी पाणी जायकवाडीत जाणार आहे. सर्व पाणी पोहोचायला किमान आठ दिवस लागतील. या दरम्यान असलेल्या बंधाऱ्यांतील पाणी सोडून देण्याने या गावांचे मोठे नुकसान होणार आहे. वीज बंद असल्याने उभ्या पिकांना ताण बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
सध्या मुळा धरणातून जायकवाडीकडे जायकवाडी धरणाकडे सात हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू अाहे. बुधवारी सकाळी दहा वाजता जायकवाडीच्या बॅकटवॉटरपर्यंत गेले आहे. शनिवारपर्यंत मुळा धरणातून विसर्ग सुरू राहणार अाहे.

मुळा धरणातून सोमवारी दुपारी दाेन वाजता जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी जायकवाडीच्या बॅकटवॉटरपर्यंत पोहोचण्यासाठी ५२ तास लागले. सध्या मुळा धरणात १८ हजार ५९४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. पाणी गेल्यानंतर तो १५ दशलक्ष घनफुटांपर्यंत येणार आहे. त्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांत तीव्र संताप असला, तरी ते काहीही करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे.
भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाण्याने निळवंडे भरल्यानंतर गुरुवारी पाच हजार क्युसेक्सने जायकवाडीकडे पाणी सोडण्यात आले. हा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येणार आहे. निळवंडेतून सोडलेले सर्व पाणी ४.३ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचेपर्यंत किमान आठ दिवस लागतील. तितके दिवस या भागातील वीज बंद ठेवण्यात येणार आहे. कोणी डिझेलच्या पंपाने पाणी उचलू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरच्या भागातील शेतकऱ्यांना चोर ठरवण्याचा अधिकार ‘गोदावरी खोरे’च्या अधिकाऱ्यांना कोणी दिला, असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
"मुळा'बाबत लुटुपुटुची लढाई
नगरनािशक जिल्ह्यातून जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी झाल्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील नेते मंडळी न्यायालयीन लढाया करतात. मात्र, मुळाच्या लाभक्षेत्रातील नेतेमंडळी केवळ रास्ता रोको सारखे दिखाऊ आंदोलन करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे मुळा धरणातून असेच पाणी जात राहणार आहे.
११५ गावांना फटका
भंडारदराते जायकवाडीदरम्यान तालुकानिहाय गावे क्षेत्र : अकोले : ३२, संगमनेर : १२, राहाता : ८, श्रीरामपूर : ३२, नेवासे : १३ या गावांत सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रावर पिके उभी आहेत. पाणी जाताना या गावांतील वीज बंद राहणार असल्याने पाणी देता आल्याने तेथील पिकांचे नुकसान होणार आहे.
पाण्यासाठी पिकांचा बळी
अकोलेतालुक्यातील ३२ गावांत प्रवरेतील पाणी फक्त लिफ्ट करता येते. वीजच बंद असल्याने पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे परिसरातील ऊस, गहू, हरभरा, भाजीपाला फळबागांचे नुकसान होणार आहे. हीच स्थिती प्रवरेकाठच्या संगमनेर, राहाता, श्रीरामपूर नेवासे तालुक्यातील गावांत राहणार आहे. गहू हरभऱ्यासारखी पिके निघाल्यानंतर जायकवाडीत सोडता आले असते. पण, तेवढी शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करण्याची गरज ‘गोदावरी खोरे’च्या अिधकाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘गोदावरी खोरे’ची दादागिरी
जायकवाडीधरणावर अवलंबून असलेले औरंगाबाद शहर, सर्व औद्योगिक क्षेत्र इतर मिळून वर्षभरात चार टीएमसी पाण्याची गरज असते. सध्या जायकवाडीत मृत २६ २३ टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. आणीबाणीची स्थिती असेल, तर जायकवाडीच्या मृतसाठ्यातील चार टीएमसी पाणी उचलण्यास मेंढेगिरी समितीने दिली आहे. सध्या धरणात पुरेसा पाणीसाठा असताना घाईघाईत फक्त नगर जिल्ह्यातील जायकवाडीच्या आधीच्या धरणातून पाणी सोडणे, म्हणजे गोदावरी खोरे महामंडळाने दादागिरी केल्याचा आरोप होत आहे.