आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा-प्रवरावर महाआघाडीचे निर्विवाद वर्चस्व; विखे, ससाणे, मुरकुटे, गाडे गटाचा सर्व जागांवर विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - मुळा-प्रवरावीज संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बड्या नेत्यांच्या महाआघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. विरोधकांचा दणदणीत पराभव झाला. २१ जागांपैकी चार जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या.

मुळा प्रवरा संस्थेचा वीज परवाना रद्द झाल्यानंतर प्रथमच निवडणूक झाली. संस्थेचे सुमारे सव्वा लाख सभासद असताना निवडणुकीसाठी केवळ ३६ हजार २३२ सभासद मतदार पात्र ठरले. निवडणुकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे, भानुदास मुरकुटे, रामदास धुमाळ, शिवाजी गाडे यांची महाआघाडी होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यास यश आले नाही. विरोधी शिवसंग्राम छावा संघटनेने श्रीरामपूर बाभळेश्वर विभागात उमेदवार दिले. १८ हजार २४७ (५०.३६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राहुरी विभागातून शिवाजी सागर, रावसाहेब राधुजी तनपुरे, अनिल भट्टड, तसेच रावसाहेब यादवराव तनपुरे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते. उमेदवारांना िमळालेली मते- श्रीरामपूर शेती मतदारसंघ- इंद्रनाथ थोरात १४८६, जी. के. पाटील १४९३ (विजयी), नितीन पटारे-१५५ पराभूत. बाभळेश्वर शेती- डॉ. सुजय राधाकृष्ण विखे -४२६६, अंबादास ढोकचौळे ४२७१ (विजयी) अरुण पुंजाजी कडू २०४, बाबासाहेब निर्मळ ९६, पांडुरंग शिंदे १०९ (पराभूत). श्रीरामपूर घरगुती-सिद्धार्थ मुरकुटे-१७२६, जलीलभाई पठाण-१६२१ (विजयी), अमजद कुरेशी १४४, गंगुबाई पवार ३५०, युनूस शेख-१७३ (पराभूत). बाभळेश्वर घरगुती दीपक शिरसाठ ६३१०, देवीचंद तांबे ६१४४ (विजयी), दगडू भांड-१५५, नारायण घोरपडे २३३ (पराभूत). महिला मतदारसंघ रतनबाई बेंद्रे १६७२१, शशिकला पाटील १६८७२ (विजयी). शेख तमिजबी रशीन ९१२, मंदाकिनी हरिभाऊ तुवर ९८० (पराभूत) आणि विशेष मागासवर्गीय मतदारसंघाची संजय छल्लारे १६९०२ (विजयी), भास्कर बाबुराव मसणे २१८, पांडुरंग गणपत शिंदे ७९९ (पराभूत). अनुसुचित जाती-जमाती चित्रसेन लक्ष्मण रणनवरे १६८७१ (विजयी), वसंत आनंदा ब्राम्हणे ३०५, पोपट सुखदेव गायकवाड ३६५ (पराभूत).
बातम्या आणखी आहेत...