आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mungala Film Based On Drought Reality Very Soon Release

रूपेरी पडदा: दुष्काळाच्या वास्तवावरील 'मुंगळा' लवकरच प्रदर्शित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मुंगळा या चित्रपटातील कलावंत.
नगर - माणसाच्या निसर्गनिर्मित दुष्काळावर परखडपणे भाष्य करणारा, तसेच दुष्काळाचे वास्तव मांडणारा मुंगळा चित्रपट आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक विजय देवकर यांनी मंगळवारी सांगितले.

देवकर, निर्माता गौरव भानुशाली, अभिनेते चेतन दळवी, अभिनेत्री ज्योती जोशी, राम कदम, निखिल म्हात्रे, दीपक चौधरी यांनी 'दिव्य मराठी' कार्यालयाला भेट देऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. देवकर म्हणाले, मुंगळा हा दुष्काळावर आधारित चित्रपट आहे. नियोजनाच्या अभावामुळे पडलेला दुष्काळ, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा दुष्काळ कसा असतो, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. प्रत्येक माणूस मुंगळा असतो. तो मुंगळा असल्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. चित्रपटात मुंगळा प्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. दुष्काळातून कसा मार्ग काढायचा याबाबत सकारात्मक विचार मांडण्यात आला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर निश्चितपणे शेतकरी आत्महत्येपासून प्रवृत्त होतील, असे ते म्हणाले.

निवडणुकीत एका मोठ्या राजकीय नेत्याने आपल्या भाषणात म्हटले होते, ‘महाराष्ट्रातील पाण्याची टंचाई आम्ही संपुष्टात आणणार आहोत, वेळ पडली तर कर्नाटकातून महाराष्ट्रात रेल्वेने पाणी आणू. आता तर चंद्रावरसुद्धा पाणी सापडले आहे.’ वास्तवात पाणी टंचाई दूर झाली नसली, तरी चंद्रावरच्या याच पाण्यावर मात्र या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गावांमधील ग्रामस्थांनी आपला अधिकार सांगितला आहे. या चित्रपटात शासन, प्रशासन आपल्यालाही नागरिक म्हणून विचार करायला लावणारी आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून त्यांना ‘मुंगळा’च्या प्रवृत्तीची आठवण करून देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न असल्याचे देवकर यांनी सांगितले.

चित्रपट पाहून एकजरी शेतकरी ‘मुंगळा’ झाला, तरी त्याचा आत्महत्येचा विचार सोडून तो स्वाभिमानाने जगेल, असे निर्माता गौरव भानुशाली म्हणाले. लोकेश गुप्ते प्रमुख भूमिकेत असून, गणेश यादव, ज्योती जोशी, सुहास पळशीकर, चेतन दळवी मुख्य भूमिकेत आहेत. राम कदम, मृणाली जांभळे, हरी ठुमके, मुकेश फाळके, भूषण घाडी, दीपक करंजीकर, जनार्दन परब, वैजनाथ चौगुले, गौरी देशमुख, सविता हांडे आदी कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. आयटम साँगवर सारा श्रवण बाळकृष्ण शिंदे यांनी दिलखेचक नृत्य सादर केले आहे. येत्या ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

दुष्काळाचे चटके...
मूळचामी सांगली जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील दुष्काळ, जनावरांच्या छावण्या, छावण्यात जगणारी माणसे मी जवळून पाहिली आहेत. त्यातूनच या चित्रपटाची कथा सूचली. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे काम सुरु केले आहे. आम्ही येत्या शुक्रवारी नानांच्या घरी जाऊन मदतीचा धनादेश देणार आहोत. विजय देवकर, दिग्दर्शक.