आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या तिजोरीत दोन दिवसांत ३९ लाख जमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उपायुक्तअजय चारठाणकर यांनी मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी खमकी भूमिका घेतल्याने दोन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ३९ लाख रुपये जमा झाले आहेत. सामान्य थकबाकीदारांऐवजी सध्या व्यावसायिक थकबाकीदारांना लक्ष्य करण्यात आले आहे. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक थकबाकीदारांनी पैसे भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश चारठाणकर यांनी वसुली अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिकेसमोर सध्या आर्थिक पेच उभा आहे. त्यातच ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द हाेणार आहे. त्यामुळे मालमत्ता कर हे एकमेव उत्पन्नाचे साधन मनपाकडे आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडे मनपाचे तब्बल सव्वाशे कोटी थकले आहेत. प्रत्येक वर्षी वसुली मोहीम राबवली जाते, परंतु ३५ ते ४० कोटींपेक्षा अधिक वसुली होत नाही. त्यात बड्या थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु बडे थकबाकीदार थकीत रकमेत सूट देऊनही पैसे भरण्यास तयार होत नाहीत. वसुली मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याने बडे थकबाकीदार सोकावले आहेत. उपायुक्त चारठाणकर यांनी या बड्या थकबाकीदारांना लक्ष्य करत प्रभावी वसुली मोहीम हाती घेतली आहे. थकबाकी भरल्यास मालमत्ता जप्त करा, असे स्पष्ट आदेशच चारठाणकर यांनी दिले आहेत. शिवाय जे वसुली अधिकारी कामात कुचराई करतील, त्यांची झाडाझडती घेण्यासही चारठाणकर मागे-पुढे पहात नाहीत. खमके अधिकारी अशी चारठाणकर यांची ओळख आहे. त्यामुळे थकबाकी भरल्यास जप्तीची कारवाई अटळ आहे, या भीतीपोटी व्यावसायिक थकबाकीदार कारवाईपूर्वीच पैसे भरत आहेत. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत दोनच दिवसांत तब्बल ३९ लाख रुपये जमा झाले आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याने मनपाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होणार आहे.

इतरांना का जमत नाही?
थकबाकीवसुलीची जबाबदारी उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्याकडे आहे. ते रजेवर गेल्याने त्यांचा पदभार सध्या उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे आहे. चारठाणकर यांनी वसुली मोहीम सुरू करून दोनच दिवसांत मनपाच्या तिजोरीत ३९ लाख रुपये जमा केले, जर चारठाणकर प्रभावीपणे वसुली करू शकतात, तर इतर अधिकारी का करू शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वसुलीचा दोन वेळा आढावा
चारठाणकरयांनी संबंधित अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. उद्दिष्टाप्रमाणे काम झालेच पाहिजे, अशा कडक सूचना चारठाणकर यांनी दिल्या आहेत. शिवाय वसुलीबाबत ते दिवसातून दोन वेळा आढावा घेतात. वसुलीत येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करून जास्तीत जास्त वसुली कशी होईल, यासाठी चारठाणकर प्रयत्न करत आहेत. मनपाचे इतर अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.