आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कावीळ रोखण्यासाठी आयुक्तांचे फर्मान, उपाययोजनांचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-काविळीची साथ रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या प्रबोधनावर भर दिला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्या, तरी शहराच्या विविध भागात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. साथीबाबत सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटल्याने महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी संबंधित अधिका-यांना तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
आगरकर मळ्यापासून सुरू झालेली काविळीची साथ आता विविध भागात पसरली आहे. सातशेहून अधिकजणांना काविळीची, तर सातजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यापैकी दोघांचा काविळीने, तर एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अधिका-यांना फैलावर घेतले. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना करून त्याचा अहवाल दररोज सादर करा, असे आदेश आयुक्त कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर व शहर अभियंता नंदकुमार मगर यांना शुक्रवारी दिले. टाक्यांची स्वच्छता, पाइपलाइन दुरूस्ती, पाण्याची तपासणी, फिरता दवाखाना, मोफत रक्त तपासणी, धूर फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू आहेत, परंतु अजूनही अनेक भागात दूषित पाणीपुरवठा सुरूच असल्याने काविळीच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य पथकाच्या सूचनांप्रमाणे प्रशासनाने नागरिकांच्या प्रबोधनाची व्यापक मोहीम सुरू केली आहे. जागोजागी फलक लावून, तसेच रिक्षा फिरवून कावीळ होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. रुग्णांची माहिती देण्याबाबत सर्व खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण असतील, तेथे प्राधान्याने आवश्यक त्या उपाययोजना व प्रबोधन करण्यात येत आहे.

आरोग्य पथकाच्या माहितीनुसार साथ रोखण्यासाठी आणखी तीन महिने काळजी घ्यावी लागेल. वेळोवेळी तपासणी करूनच पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. नागरिकांनी पाणी उकळून गार करून प्यावे, काविळीची लक्षणे आढळून आल्यास रक्त तपासणी करून वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन महापािलका प्रशासनाने केले आहे.

असे आहे मनपा आयुक्तांचे फर्मान
साथरोग भागात समक्ष पाहणी कचरा उचलून औषध फवारणी बाधीत रुग्णांची दररोज माहिती घेणे रुग्णांना औषध पुरवठा व मार्गदर्शन मनपाची आरोग्य यंत्रणा अद्ययावत ठेवणे भेटी देण्याचे वेळापक निश्चित करणे हॉटेल्स व खानावळीतील पाणी तपासणे सार्वजनिक स्थळांची प्राधान्याने स्वच्छता करणे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवणे पाइपलाइन गळती दुरूस्तीसाठी स्वतं मोहीम टाक्या स्वच्छ केल्याची तारीख फलकावर लिहिणे पाहणी व उपाययोजनांचा दररोज अहवाल देणे.