आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Matahi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कावीळ, डेंग्यूचे शहरात थैमान, डेंग्यूचा १ बळी; काविळीच्या रुग्णांची संख्या ६३५ वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काविळीपाठोपाठ शहराला डेंग्यूचीही लागण झाली आहे. काविळीने दोन, तर डेंग्यूने एक बळी घेतला. महापालिकेच्या नोंदीनुसार ६३५ जणांना काविळीची, तर १० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. पंधरा दिवस उलटूनही साथ आटोक्यात न आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कावीळ व डेंग्यूची साथ रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक अनलि शिंदे व स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाने मंगळवारी आयुक्तांना दलित. अशोक दराडे व गोरख घेवरे या दोघांचा काविळामुळे, तर श्रमिकनगर येथील लक्ष्मण बापूराव सिद्दम यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना आजारांची लागण झाली आहे. शहरातील विविध भागात सुमारे सहाशेपेक्षा अधिक जण काविळीने त्रस्त आहेत. विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीतदेखील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. एकीकडे काविळीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे, तर दुसरीकडे प्रशासन सर्व काही आलबेल असल्याचे सांगत आहे. काविळाच्‍या साथीमुळे शहरातील पाण्याच्या टाक्या (आगरकर मळ्यातील दोन टाक्या) बारा वर्षांनंतर प्रथमच स्वच्छ केल्या गेल्या. इतर टाक्यांच्या स्वच्छतेकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. एक फिरता दवाखाना, देशपांडे रुग्णालयात मोफत रक्त तपासणी व जलि्हा रुग्णालयात राखीव वॉर्ड या पलीकडे कोणत्याही ठोस उपाययोजना मनपाने केलेल्या नाहीत. मुळात दूषित पाणीपुरवठा कोणत्या कारणाने होतो, याबाबत प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने सोमवारी (१ सप्टेंबर) काविळीची लागण झालेला परिसर व पाण्याच्या टाक्यांची पाहणी केली. पाण्यात क्लोरीन पावडरचे प्रमाण कमी असल्यामुळे काविळीची लागण झाल्याचा निष्कर्ष या पथकाने काढला. मात्र, दूषित पाण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन वेळीच जागी का झाले नाही, असा सवाल नगरसेवकांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या, तरी आगरकर मळा परिसरात अजून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. सीना नदीतून गेलेल्या पाइपलाइनमध्ये ड्रेनेजचे पाणी उतरल्यामुळे आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. प्रशासन मात्र केवळ टाक्यांची स्वच्छता करून उपाययोजना केल्याचा देखावा करत आहे. त्यामुळे संतापलेल्या स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक अिनल िशंदे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली. काविळीची साथ रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे.
मनपाची आरोग्य केंद्रे अडगळीत
महापालिकेची सातपैकी पाच आरोग्य केंद्रे अडगळीत पडली आहेत. पुरेसे कर्मचारी व साधनसामग्री नसल्याने ही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आहेत ते कर्मचारी केंद्रात उपलब्ध नसतात. कावीळ व डेंग्यूची साथ रोखण्यासाठी या केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरली असती, परंतु मनपाने केंद्रांमधील सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. कावीळ व डेंग्यू रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाकडे सध्या सुविधा उपलब्ध नाही. देशपांडे रुग्णालयातही केवळ गर्भवती महिलांवर उपचार करण्यात येतात.
धूर फवारणी करण्याच्या सूचना
शहरात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे सात रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर धूर फवारणीच्या सूचना मनपाला दलि्या आहेत. घरोघर फवारणी आवश्यक आहे. टाक्या आठवड्यातून किमान एकदा कोरड्या कराव्यात. पाणी गाळून घ्यावे. चितळे रस्त्यावरील हिवताप कार्यालयातून गप्पी मासे घेऊन जावेत. मनपाने मोठ्या टाक्या धुवून घ्याव्यात. पाणी वाहते ठेवावे. स्वच्छतेची काळजी घ्यावी. खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.''बी. बी. घुसळे, हिवताप अधिकारी
आरोग्‍यअ‍धिका-यांचा स्वत:चा दवाखाना
शहरात कावीळ व डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेचे प्रभारी आरोग्यािधकारी डॉ. सतीश राजूरकर स्वत:चा खासगी दवाखाना चालवत आहेत, अशी तक्रार नगरसेवक विजय गव्हाळे यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. शहरात काविळीचे किती रुग्ण आहेत, काय उपाययोजना सुरू आहेत याबाबत मािहती विचारण्यासाठी राजूकर यांच्याशी "दिव्‍य मराठी'नेही अनेकदा संपर्क साधला, परंतु त्यांना एकदाही समाधानकारक उत्तर देता आले नाही.