आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा वर्धापनदिनाचा खर्च वृक्षलागवडीसाठी, महापौर अभिषेक कळमकर यांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेचा वर्धापनदिन (३० जून) लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यमान महापौर अभिषेक कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे. महापौरांनी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. वाचलेल्या पैशांतून वेगवेगळ्या प्रकारची रोपे ट्री गार्ड खरेदी करण्यात येतील.
महापालिकेची स्थापना होऊन एक दशक पूर्ण झाले आहे. ३० जून २००३ रोजी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले, तेव्हापासून दरवर्षी ३० जूनला महापालिकेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. वर्धापनदिनी मनपा कार्यालयाच्या इमारतीवर विद्युत रोषणाई केली जाते. रांगोळी, विविध प्रकारच्या कमानी यावर लाखो रूपयांचा खर्च हाेतो. मनपाच्या अंदाजपत्रकात त्यासाठी दरवर्षी स्वतंत्र तरतूद करण्यात येते. परंतु हा सर्व खर्च वाया जातो. यंदा मात्र ३० जूनला महापालिकेचा वर्धापनदिन वेगळ्या पध्दतीने साजरा होणार आहे. महापौर कळमकर यांनी वर्धापनदिनावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो वृक्ष लागवडीसाठी खर्च करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या वाचलेल्या पैशांतून विविध प्रकारची रोपे ट्री गार्ड खरेदी करण्यात येतील. या दिवशी शहराच्या विविध भागात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. लावलेल्या वृक्षांचे योग्य पध्दतीने संवर्धन व्हावे, यासाठी ट्री गार्ड बसवणे आवश्यक आहे. त्यासाठीच वर्धापनदिनाचा अनावश्यक खर्च टाळून त्यातून जास्तीत जास्त ट्री गार्ड खरेदी करण्याचा निर्णय महापौर कळमकर यांनी घेतला आहे.

वृक्षलागवड ही काळाची गरज
^पर्यावरणाच्या संतुलनासाठी महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. महापालिकेचा यंदाचा वर्धापनदिन वृक्ष लागवडीनेच साजरा करण्यात येईल. वर्धापनदिनावर होणारा अनावश्यक खर्च टाळून ट्री गार्ड खरेदी करण्यात येणार आहेत.'' अभिषेक कळमकर, महापौर.
बातम्या आणखी आहेत...