आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेसाठी नगर शहरात सरसावली तरुणाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 350 महाविद्यालयीन युवक-युवतींनी रविवारी माळीवाडा बसस्थानकाचे आवार स्वच्छ केले. नंतर तेथे झाडांच्या कुंड्या ठेवून परिसर सुशोभित करण्यात आला.
देसर्डा-भंडारी इन्स्टिट्यूट, निरामय ग्रुप व केअर फॉर यू यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माळीवाडा बसस्थानक हे मध्यवर्ती व वर्दळ असलेले स्थानक आहे. अस्वच्छतेमुळे तेथे उभे राहणेही प्रवाशांना शिक्षा वाटते. युवक-युवतींनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने हा परिसर स्वच्छ केला. तीन तास सुरू असलेल्या या अभियानात महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, अभियानाचे संयोजक संदीप देसरडा, प्रसाद भंडारी, शिरीष लाहोटी, उमेश डोडेजा, सिद्धांत मंडलेचा, बसस्थानक प्रमुख कांबळे, आगार व्यवस्थापक नेहूल आदी सहभागी झाले. स्वच्छता केल्यानंतर जंतूनाशकांची फवारणी करून फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या.