आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळजोडासाठी पाणीपट्टी भरा; मनपाकडून सक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव पाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहिनीवर नळजोड घेण्यापूर्वी नागरिकांना पाणीपट्टी भरण्याची सक्ती केली जात आहे. एकीकडे नळजोडाचा दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च, तर दुसरीकडे पाणीपट्टी भरण्याची सक्ती होत असल्याने सर्वसामान्य केडगावकर चांगलेच वैतागले आहेत. प्रशासन वारंवार नळजोडाचे पैसे भरण्याचे आवाहन करत असले, तरी िबघडलेल्या आर्थिक गणितामुळे नागरिकांनी सध्यातरी पैसे भरण्याकडे पाठ फिरवली आहे.

केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी अंतर्गत केडगाव उपनगरासाठी असलेल्या पाणी योजनेचे (फेज १) काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नवीन जलवाहिन्यांवर नळजोड स्थलांतरित करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. नळजोड स्थलांतराचा सुमारे कोटी ४७ लाखांचा खर्च कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च नागरिकांनीच करावा, असा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला. नागरिकांनी नळजोडाचा पन्नास टक्के खर्च रोख, तर उर्वरित पन्नास टक्के खर्च संकलित करातून करावा, असा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यानंतर या कामासाठी एस. आर. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली. मात्र, जोपर्यंत नागरिक नळजोडाचा ५० टक्के खर्च रोख स्वरूपात भरत नाहीत, तोपर्यंत नळजोडाच्या कामास गती मिळणार नाही. त्यासाठी मनपा प्रशासनाने केडगाव उपनगरात माहितीपत्रके वाटून नळजोडाचा खर्च भरण्याचे आवाहन नागरिकांना केले. परंतु प्रभाग समिती कार्यालयाने नळजोडाच्या खर्चासह पाणीपट्टी भरण्याची सक्ती केल्याने नागरिकांवरील आर्थिक ताण वाढला आहे. अनेकांनी नळजोडाचे पैसे भरणेच पसंत केले आहे. त्यामुळे नळजोडाच्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

शिवाय पाणीपट्टी नळजोडाचे पैसे भरल्यानंतर नळजोड किती दिवसांत मिळेल, त्यासाठी कोणत्या प्रकारचे दर्जाचे पाइप वापरणार, नळजोडाचे अंतर कमी असल्यास कमी पैसे भरता येतील का, ठेकेदार चांगले काम करणार का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. नळजोडाचे काम करणार्‍या ठेकेदार संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. परंतु नागरिकांनी नळजोडाचे पैसे भरल्यास हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

चांगला प्रतिसाद
केडगाव पाणी योजनेच्या नळजोडाचे काम लवकरच मार्गी लागेल. नळजोडासाठी लागणारा खर्च भरण्यास नागरिक तयार आहेत. मनपाच्या आवाहनानंतर लोक पैसे भरत आहेत. नळजोडाच्या खर्चासह पाणीपट्टी भरणे सक्तीचे नाही, परंतु प्रभाग समिती कार्यालयाने वसुली वाढवण्यासाठी पाणीपट्टी भरण्याचा आग्रह धरला असेल.'' परिमल निकम, पाणीपुरवठा विभागप्रमुख.

खर्चाचे विचारलेच नाही
अंतिमटप्प्यात आलेले काम केवळ नळजोडांअभावी रखडले होते. नळजोडाचा खर्च नागरिकांनी करावा असा निर्णय महासभेत घेण्यात आला. परंतु त्यापूर्वी नागरिकांना विचारण्यात आले नाही. महासभेत परस्पर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फेज चे पाणी मिळणार असले, तरी त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार असल्याची ओरड सध्या केडगावकरांमध्ये आहे.

केडगावला हजारांपेक्षा अधिक नळजोड
केडगावउपनगरात सध्या हजार ७४ नळजोडांची नोंद आहे. हे सर्व नळजोड नवीन जलवाहिन्यांवर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. परंतु त्यासाठी नागरिकांनी नळजोडाचा खर्च भरणे आवश्यक आहे. पाणी योजनेत काही नवीन भागाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन नळजोडांचा भार नवीन जलवाहिन्यांवर पडणार आहे. सर्व नळजोडांची संख्या सात हजारांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक नळजोडासाठी खर्च
- रस्ताक्रॉस करून नळजोड : ३०५२
- रस्ता क्रॉस करता नळजोड : २२९१
- नळजोडापूर्वी रोख स्वरूपात : ५० %
- संकलित कराच्या बिलातून : ५० %