आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation Development Fund Issue Nagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलनिस्सारण प्रकल्पासाठी मनपाकडे निधीच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहरातील सांडपाणी सीना नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीकाठावरील अनेक गावे प्रदूषित झाली आहेत. याबाबत नाराजी व्यक्त करीत विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी महापालिकेने स्थानिक विकास निधीतून मलनिस्सारण प्रकल्प सुरू करावा, अशा सूचना दिल्या. तथापि, हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मनपाकडे पुरेसा निधीच नाही.

पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत 5 ऑगस्टला जिल्हा परिषद व नियोजन भवनात बैठक झाली. या बैठकांमध्ये जि. प. सदस्यांनी सीनापात्रातील दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. कोणतीही प्रक्रिया न करता नगर शहरातील सांडपाणी नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदीकाठची 25 गावे प्रदूषित झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सदस्य बाळासाहेब हराळ म्हणाले. याबाबत आयुक्त जाधव म्हणाले, नाशिक येथील गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा वाद न्यायालयात गेला होता. त्यावेळी न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. नगरबाबत न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देऊ नका. महापालिकेलेने तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक विकास निधीतून तातडीने उपाययोजना कराव्यात.

मनपा उपायुक्त महेश डोईफोडे यांनी याबाबत प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगितले. तथापि, निधीची वाट पाहू नका. कारण हा आरोग्याचा प्रश्न असल्याने स्थानिक निधीतूनच उपाययोजना करावी, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासाठी साठ कोटी खर्च अपेक्षित आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने निधी कोठून आणायचा असा प्रश्न आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, पण केंद्रीय स्तरावरील मान्यता प्रलंबित आहे, असे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.