आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Congress Meeting Nagar

मनपा निवडणुकीसाठी उद्या काँग्रेसची बैठक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी महापालिका निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी रविवारी (29 सप्टेंबर) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठक होणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी दिली.

लालटाकी येथील शहर जिल्हा काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन थोरात व विखे यांच्या हस्ते होईल. नंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. या बैठकीला आमदार डॉ. सुधीर तांबे, भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, विनायक देशमुख, दादापाटील शेळके, युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबे, अनुराधा नागवडे आदी उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे प्रभारी आमदार शरद रणपिसे सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृहावर नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.