आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची निवड समिती जाहीर; 27 जणांचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीतील उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसने 27 जणांची निवड समिती शुक्रवारी जाहीर केली. पक्षाचे प्रभारी आमदार शरद रणपिसे यांनी ही समिती जाहीर केली.

या समितीत संपर्कमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शरद रणपिसे, डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, नामदेव भगत, अरुण मुगदिया, अश्विनी बोरस्ते, फजल अन्सारी, अजित आपटे, दशरथ पाटील, विनायक देशमुख, सुवालाल गुंदेचा, बाळासाहेब भुजबळ, रईसा शेख, डी. एम. कांबळे, नगरसेवक निखिल वारे, धनंजय जाधव, नलिनी गायकवाड, सविता मोरे, अभिजित लुणिया, दीप चव्हाण, उबेद शेख, खलील सय्यद, मुन्ना चमडेवाला यां चा समावेश आहे. निवड मंडळाचे समन्वयक म्हणून अनंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. शनिवारी (16 नोव्हेंबर) होणार्या मुलाखती निवड समिती सदस्यांच्या उपस्थितीत होतील.