आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Youth Congress Demand Seasts In Nagar

युवक काँग्रेसला हव्यात निम्म्या जागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगली फळी तयार झाली आहे. यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत युवक काँग्रेसला निम्म्या जागा द्याव्यात, अशी मागणी पक्षर्शेष्ठींकडे करण्यात आली आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी दिली.

झावरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील इच्छुकांची चाचपणी करून मते जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, गौरव ढोणे, केतन शेंडगे, मुबीन शेख, अजय औसरकर, कुलदीप भिंगारदिवे, डॉ. विशाल घंगाळे, पीयूष लुंकड, राजेश बाठिया, अजिंक्य पानसंबळ, अनुराधा येवले, कौशल गायकवाड, अभिजित दरेकर, डॉ. शकिला शेख, मंगल भुजबळ, योगेश चिपाडे आदी यावेळी उपस्थित होते. झावरे म्हणाले, महापालिका निवडणुकीत युवक काँग्रेसला निम्म्या जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी पक्षर्शेष्ठींकडे मागणी केली आहे. युवकांचा काँग्रेसकडे येण्याचा चांगला कल आहे. शहराचा विकास साधायचा असेल, तर सुशिक्षित युवक उमेदवारांना उमेदवारी देणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही निम्म्या जागा घेणारच आहोत, असे ते म्हणाले. या मागणीला उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. निखिल वारे म्हणाले, दरवेळी निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलले जाते. बाळासाहेब पवार यांनी इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढवण्याबाबत मार्गदर्शन केले.