आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीदारांचा ठेंगाच..शास्ती माफ करूनही २० दिवसांत भरले अवघे दीड कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका प्रशासनाने दिलेल्या शास्तीमाफीस थकबाकीदारांनी ठेंगा दाखवला आहे. शास्तीमाफी देऊन २० दिवस उलटले, तरी मनपाच्या तिजोरीत अवघे दीड कोटी रुपये जमा झाले आहेत. सत्ताधारी, विरोधक थकबाकीदारांच्या मागणीनुसार प्रशासनाने शास्ती माफ केली, तरी देखील थकबाकीदारांनी पैसे भरल्याने मनपासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे दहा दिवसांनंतर शास्तीमाफीच्या सवलतीची मुदत संपताच थकबाकीदारांच्या मालमत्तांना सील ठोकण्यात येणार आहे.

थकबाकी वसुली हा महापालिका प्रशासनासमोरील मोठा प्रश्न आहे. थकबाकीदार उत्स्फूर्तपणे पैसे भरतील, या उद्देशाने प्रशासनाने ३१ मार्च १०१४ पूर्वीच्या थकबाकीदारांची ७५ टक्के, तर चालू आर्थिक वर्षातील थकबाकीदारांची शंभर टक्के शास्ती माफ केली. एका महिन्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. त्यापैकी २० दिवस संपले असून आतापर्यंत केवळ दीड कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित दहा दिवसांतही फारशी वसुली होईल, असे चित्र नाही. थकबाकीदारांच्या साेयीसाठी प्रशासनाने सुटीच्या दिवशीदेखील वसुली कार्यालये सुरू ठेवली. सवलतीचा लाभ घेत जास्तीत जास्त थकबाकीदारांनी पैसे भरावेत, असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले. परंतु थकबाकीदारांनी पैसे भरलेच नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीपासून थकबाकीदारांच्या मालमत्तांना सील ठोकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

थकबाकीदारांनी ठेेंगा दाखवल्याने शास्तीमाफीची मागणी करणारे सत्ताधारी विरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. आर्थिक वर्ष संपत आले, तरी १३२ कोटींच्या थकबाकीपैकी केवळ २४ कोटी ६७ लाखांची वसुली झाली. त्यात कोटी ६६ लाख जुनी, तर १५ कोटी १४ लाख रुपये चालू आर्थिक वर्षातील रक्कम आहे. उर्वरित थकबाकीच्या वसुलीसाठी प्रशासनाकडे अवघे दोन महिने (३१ मार्चपर्यंत) उरले आहेत. थकबाकीच्या एकूण रकमेपैकी ४२ कोटी ७९ लाखांची शास्तीची रक्कम आहे. ही रक्कम आज ना उद्या माफ होईल, त्यानंतरच थकबाकी भरू, असा पवित्रा थकबाकीदारांनी घेतला होता. आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनीदेखील शंभर टक्के शास्ती माफ करावी, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे आयुक्तांनी शास्तीमाफी दिली. मात्र, थकबाकीदारांनी या सवलतीला ठेंगा दाखवल्याने मनपासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.