आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात ७०० कुटुंबांच्या घराची स्वप्नपूर्ती, प्रत्येक कुटुंबाला मिळणार २६९ चौरस फुटांचे घर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वत:चे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय, परंतु घर बांधणे अथवा ते विकत घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. वाढलेली महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण अशा एक ना अनेक कारणांमुळे अनेकांचे घराचे स्वप्न शेवटपर्यंत स्वप्नच राहते. महापालिकेने मात्र तब्बल सातशे कुटुंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले, तेदेखील अगदी मोफत. घरकुल योजनेंतर्गत सातशे घरांच्या तीन प्रकल्पांचे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे. महिनाभरात या कुटुंबांना त्यांचे हक्काचे घर मिळेल. स्वत:च्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होणार यापेक्षा दुसरा आनंद काय, अशा शब्दांत लाभार्थींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नगर शहरात स्वत:चे घर घेणे ही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची बाब होत चालली आहे. पुणे, औरंगाबाद नाशिक या शहरांच्या तुलनेत नगरमधील घरांच्या िकमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने तब्बल सातशे कुटुंबांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली आहेत. केंद्र राज्य शासनाचा एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना रमाई आवास योजनेंतर्गत महापालिकेने दोन वर्षांपूर्वी घरकुलांचे तीन प्रकल्प हाती घेतले. त्यात वारुळाचा मारुती परिसरात २५२ ११३ घरकुलांचे दोन काटवन खंडोबा परिसरात ३०० घरकुलांचा एक अशा तीन प्रकल्पांचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकल्प सध्या पूर्णत्वाकडे आहेत. येत्या महिनाभरात ते पूर्ण होणार असून त्यानंतर तब्बल सातशे कुटुंबांना त्यांची हक्काची घरे उपलब्ध होतील.
या प्रकल्पांसाठी केंद्र राज्य शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यात महापालिका लाभार्थींची दहा टक्के रक्कम आहे. प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटांचे सर्व सोयी-सुविधा असलेले घर मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी स्वत:च्या जागेवर घर बांधण्यासाठी दोन लाखांपर्यंत शंभर टक्के अनुदानही महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. या योजनेचा आतापर्यंत २८ जणांनी लाभ घेतला आहे. माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात घरकुलांचे हे महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात आले. शिंदे यांनी स्वत: या कामावर लक्ष दिले.
वेळोवेळी बैठका घेऊन, तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप येणार आहे. येत्या महिनाभरात हे तिन्ही प्रकल्प पूर्ण होणार असून त्यानंतर लाभार्थींना घरांचा ताबा मिळेल.
महापालिका स्थापन झाल्यानंतर १२ वर्षांत प्रथमच एक मोठे काम मार्गी लागणार आहे. त्याचे श्रेय माजी महापौर िशंदे यांच्यासह महापािलका प्रशासनाला जाते. शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणारे अनेक कुटूंब आता या नवीन घरात स्थलांतरीत होणार आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील प्रश्न ही काही प्रमाणात सुटणार आहेत. िशवाय या कुटुंबांना आरोग्यदायी जीवन जगता येईल.
११३ कामगारांना लाभ
नगरपालिकाआताच्या महापालिकेत सफाई कामगार म्हणून २५ वर्षे सेवा करणाऱ्या ११३ कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना एक रुपयादेखील खर्च करावा लागणार नाही. डॉ. आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत त्यांना ही घरे मिळतील. मनपाचे बहुतेक सफाई कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात. त्यापैकी काहींना आता हक्काची घरे मिळणार आहेत. त्यामुळे हे कर्मचारी सुखावले आहेत.
गरजुंना घरे हेच समाधान
घरकुलयोजनेसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. प्रत्यक्ष काम सुरू होण्यात अनेक अडचणी होत्या. त्या दूर करून घरकुलांचे तीन मोठे प्रकल्प सुरू केले. आता हे तिन्ही प्रकल्प पूर्णत्वाकडे अाहेत. त्यामुळे सातशे गरजु कुटुंबांच्या घराचा प्रश्न कायमचा सुटणार आहे, याचे मोठे समाधान आहे. मनपा प्रशासनाने उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून लाभार्थ्यांना घरांचा ताबा द्यावा.'' शीलाशिंदे, माजी महापौर.
वारुळाचा मारूती येथे सुरू असलेले घरकुल प्रकल्प. छाया: कल्पक हतवळणे
जून अखेर काम पूर्ण
जूनच्याअखेरीस अथवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरकुल प्रकल्पांचे काम पूर्ण होईल. काही महिन्यांपूर्वी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने कामात अडचणी आल्या होत्या. परंतु आता कामात कोणत्याच अडचणी नसून लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरांचा ताबा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कामाच्या दर्जाबाबत सुरूवातीपासून कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला चांगले घर मिळेल.''
- आर.जी. मेहेत्रे, प्रकल्प अभियंता.
इतर सुविधाही मिळणार
घरकुलांच्यातिन्ही प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांना केवळ घरेच मिळणार नाहीत, तर अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइन, संरक्षक भिंत, स्ट्रीट लाईट, उद्यान अशा अनेक सुविधाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांच्या परिसरात लाभार्थ्यांसाठी समाज मंदिरदेखील उभारण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकल्प म्हणजे शहरातील एखाद्या मोठ्या खासगी गृहप्रकल्पांप्रमाणेच आहेत. शिवाय मध्यवर्ती शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.
कुटुंबांना लाभ
७००
कोटींचा खर्च
२०
एकूण घरकुले
६९३
घरकुल प्रकल्प
0३
बातम्या आणखी आहेत...