आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक पिशवी विक्रेते महापालिकेच्या रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यशासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री उत्पादनावर बंदी घातली आहे. असे असतानाही नगर शहरात या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन प्लास्टिक पिशव्यांची विक्री वापर करणाच्या विरोधात सोमवारपासून कारवाईची मोहीम सुरू करणार आहे. होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तही घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास लगाम बसणार आहे.

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन वापरावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. मात्र, स्थानिक पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. परिणामी प्लास्टिकचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नगर शहरात दररोज जमा होणा-या १४० टन कचपैकी २५ ते ३० टक्के कचरा प्लास्टिकचा असतो. त्यामुळे शहराचे आरोग्य पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक वापराच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे अनेक दुकानदारांनी प्लास्टिक पिशवी वापरणे बंद केले. परंतु मोहीम बंद होताच भाजी फळविक्रेते, किराणा दुकाने, मेडिकल आदी ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा सुरू झाला. प्लास्टिक पिशव्यांमुळे ड्रेनेज, गटारे, तसेच ओढे-नाले तुंबले आहेत. त्यामुळे मनपाने पुन्हा एकदा कारवाईचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. येत्या सोमवारपासून ही कारवाई सुरू होणार आहे.

प्लास्टिक पिशव्यांची विक्री वापर करणा-यांना सुरुवातीला समज देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा नागरिकांवर देखील कारवाई होणार आहे. प्लास्टिक पिशव्यांची होलसेल विक्री करणारी शहरात दोन-तीन दुकाने आहेत. या दुकानांवर वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. महापालिका खरेच कारवाई करणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

प्लास्टिक कचरा पडून
प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी शहरात विविध भागात महिला फिरताना दिसतात. परंतु या महिला ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे प्लास्टिक गोळा करतात. कमी जाडीच्या प्लास्टिकला वजन नसल्याने त्याला भाव मिळत नाही. त्यामुळे महिला तो उचलत नाहीत. महापालिका प्रशासनही या कचकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करत आहे. हा कचरा तसाच पडून राहिल्याने शहरातील पर्यावरण संवर्धनाचा सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

जनजागृती करणार
प्लास्टिक पिशव्यांचा वापर विक्री करणाच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात येणार आहे. कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यासाठी बचतगटांना प्रोत्साहन देण्यात येईल. याशिवाय प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवण्यासाठी शहरात जनजागृती मोहीमही राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी खरेदीसाठी घराबाहेर पडताना सोबत कापडी पिशवी ठेवण्याची सवय लावली, तर प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल. भालचंद्र बेहेरे, उपायुक्त,मनपा.

दंडात्मक कारवाईची तरतूद
-उत्पादकांना लाख दंड वर्षे सक्तमजुरी
- विक्रेत्यांना हजार रुपये दंड
- वापर करणा नागरिकांना ५०० रुपये दंड
बातम्या आणखी आहेत...