आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथापेंकडून दंड वसुलीस टाळाटाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी माहिती आयुक्तांकडून मनपाच्या अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांना दंड करण्यात आला. मात्र, आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे ना दंड वसूल झाला, ना तक्रारदाराला माहिती मिळाली. मनपा प्रशासन खुद माहिती आयुक्तांचेच आदेश धाब्यावर बसवत असल्याचे यातून पुढे आले आहे. इथापे यांना माहिती आयुक्तांकडून दोन प्रकरणांत प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी एप्रिल २०१२ मध्ये अतिक्रमण विभागाचे प्रभारी प्रमुख इथापे यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागवली होती. महापालिका हद्दीत गुंठेवारी विकास योजनेअंतर्गत सन २००३ ते २०१२ दरम्यानच्या कार्यवाहीची माहिती त्यांनी मागितली. इथापे यांच्याकडून दिशाभूल करणारी उत्तरे मिळाल्याने शेख यांनी उपायुक्तांकडे अपील केले. अपिलात विनामूल्य माहिती पुरवण्याचा आदेश उपायुक्तांनी दिला. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाल्याने शेख यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये माहिती आयुक्तांकडे अपील केले. माहिती आयुक्त पी. डब्ल्यू. पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे लक्षात घेऊन २४ जून २०१५ रोजी निकाल दिला. १५ दिवसांच्या आत शेख यांना पोस्टाद्वारे विनामूल्य माहिती देण्याचे आदेश देण्यात आले. पूर्वीच्या आदेशानुसार माहिती दिल्याने इथापे यांना हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दोन समान हप्त्यांत इथापे यांच्या पगारातून दंडाची रक्कम कपात करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर १५ दिवस उलटून गेले, तरी शेख यांना अद्याप माहिती देण्यात आलेली नाही, तसेच दंड वसुलीची कारवाईही झालेली नाही. माहिती आयुक्ताच्या आदेशानुसार माहिती द्यावी इथापे यांच्याकडून दंडाची वसुली करावी, अशी मागणी करणारे निवेदन शेख यांनी मनपा आयुक्तांना दिले.

आणखी एका प्रकरणात मनपा अधिकाऱ्यांना दंड
माहितीनाकारल्याप्रकरणी इथापे सहायक उपायुक्त अशोक साबळे यांना माहिती आयुक्त पाटील यांनी प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावला आहे. मनपाच्या मालकीच्या चितळे रस्त्यावरील गाळ्यांमध्ये झालेल्या अतिक्रमणाबाबत अजय लयचेट्टी यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये माहिती मागवली होती. मात्र, परस्परांकडे बोट दाखवत या दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी आयुक्तांपुढे सुनावणी होऊन जुलै रोजी आयुक्तांनी संबंधित माहिती मोफत पुरवण्याचा, तसेच इथापे साबळे यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश दिला. दंडाची रक्कम वाढवण्यासाठी पुनरावलोकन अर्ज करणार असल्याचे लयचेट्टी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...