आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावकरांची लूट सुरूच, प्रत्यक्षात खर्च मनपा वसूल करत असलेल्या खर्चात मोठी तफावत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगावपाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहिन्यांवर नळजोड घेण्यासाठी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करण्यात येत आहेत. शिवाय हा खर्च सक्तीने वसूल करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. एकीकडे नागरिकांना विश्वासात घेता त्यांच्यावर हा खर्च लादण्यात आला, तर दुसरीकडे नळजोडासाठी प्रत्यक्षात येणारा खर्च मनपाकडून वसूल करण्यात येणाऱ्या खर्चात मोठी तफावत आहे. नळजोडाच्या नावावर सुरू असलेली ही लूट तत्काळ बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी अंतर्गत केडगाव उपनगरात सुरू असलेल्या पाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहिन्यांवर नळजोड स्थलांतरित करण्याचे काम सध्या सुरू आहे. नळजोडासाठी येणारा कोटी ४७ लाखांचा खर्च केडगावकरांच्या माथी मारण्यात आला आहे. एस. आर. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले आहे. नळजोडाचा खर्च कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर हा खर्च नागरिकांनीच करावा, असा ठराव (नागरिकांना विश्वासात घेता) सर्वसाधारण सभेत करण्यात आला. नागरिकांनी नळजोडाचा पन्नास टक्के खर्च रोख, तर उर्वरित पन्नास टक्के खर्च संकलित करातून करण्याचा निर्णय झाला. सध्या हा खर्च वसूल करण्यासाठी मनपा नागरिकांना वेठीस धरत आहे. रस्ता ओलांडून नळजोड घ्यायचा असेल, तर हजार ५२ रुपये रस्त्याच्या अलीकडेच नळजोड असेल, तर हजार २९१ रुपये नागरिकांकडून वसूल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे नळजोडासाठी प्रत्यक्षात हजार ते बाराशे रुपयेच खर्च येतो. मग मनपा नळजोडाच्या नावावर दुपटीने पैसे का वसूल करते. दोन ते तीन हजार रुपये खर्च करून नळजोड मिळेलच असे नाही, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जेदार असेल की नाही, घरापर्यंत नळजोड मिळेल की पुन्हा वेगळा खर्च करावा लागेल, असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाले आहेत. मनपा मात्र या प्रश्नांची उत्तरे देताच नागरिकांकडून सक्तीने नळजोडाचा खर्च वसूल करत आहे.

नवा नळजोड देण्यासाठी खोदकाम केल्याने रस्ते खराब होत आहेत. खड्डे नीट बुजवलेही जात नाहीत. रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन आहे का, हेही मनपा स्पष्ट करत नाही. दरम्यान, काहींना नवे नळजोड देण्यात आले असले, तरी या नव्या वाहिनीतून पाणीपुरवठा होण्यास बराच काळ लागेल, असे मनपा कर्मचारीच सांगतात. खर्च करूनही पाण्यात वाढ होणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

प्रत्यक्षात खर्च
३०फूट पाइप : ३०० ~
ड्रिल थ्रेडिंग : १०० ~
पाइप मजुरी : १०० ~
खोदाई : ३०० ~
सॉकेट : २५० ~
एकूण : हजार ५० ~

मनपाचा खर्च
रस्ताओलांडून नळजोड : ३०५२ ~
रस्ता ओलांडता नळजोड : २२९१ ~
नळजोडापूर्वी रोख स्वरूपात : ५० %
कर बिलातून : ५० %

मनपाचा खुलासा
नळजोडासाठीआवश्यक असलेले साहित्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील दरसूचीप्रमाणेच वापरण्यात येत आहे. नळजोडाचे साहित्य किमपल्स पाइपिंग कंपनीकडून खरेदी केले आहे. या साहित्याची मनपाने तपासणी केली आहे. सर्व साहित्य आयएसआय मानांकन आहे. ठेकेदार संस्था निविदा करारातील अटी, शर्तीप्रमाणे काम करत असल्याचा मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे.

उपमहापौरांचा विरोध
केडगावकरांकडूननळजोडाचा खर्च वसूल करण्यास उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यासह केडगावच्या सर्व नगरसेवकांचा विरोध होता. उपमहापौर कोतकर यांनी आयुक्तांना तसे पत्रही दिले होते. परंतु महासभेत नळजोडाचा खर्च नागरिकांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुदतवाढीकडे दुर्लक्ष
नागरीकांकडूननळजोडाचे पैसे सक्तीचे वसुल करता त्यांना पैसे भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र, प्रशासनाकडून या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली असून नागरीकांकडून सक्तीने नळजोडाचे पैसे वसुल केले जात आहेत.

योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
केडगावपाणी योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात सुरु झालेली ही योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा वर्षभराचाच कार्यकाळ उरला असून या कालावधीत योजना कार्यान्वित व्हावी, यासाठी कोतकर प्रयत्न करत आहेत.

पैसे भरण्यास नकार
मनपानेदहा हजार माहितीपत्रके वाटून, तसेच चार ठिकाणी फलक लावून नागरिकांना नळजोडाचा खर्च भरण्याचे आवाहन केले. केडगावात हजार २०० नळजोडांची नोंदणी आहे. त्यात आणखी सुमारे हजार नळजोडांची भर पडेल, असा मनपाचा अंदाज आहे. मात्र, नळजोडासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करण्यात येत असल्याने नागरिक पैसे भरण्यास नकार देत आहेत.