आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Employees Credit Society Will Lock Action Committee Warning

महापालिका कर्मचारी पतसंस्थेला टाळे ठोकणार, कृती समितीचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका कर्मचारी पतसंस्थेला गलथान कारभारामुळे अवकळा प्राप्त झाली आहे. सभासदांना साधे तातडीचे कर्जही मिळत नाही. शंभर टक्के वसुली असूनही पतसंस्थेवर तालुका उपनिबंधकाचे नियंत्रण नाही. त्यामुळे पतसंस्थेच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा पतसंस्था बचाव कृती समितीचे सरचिटणीस विजय बोधे यांनी पत्रकाद्वारे दिला.

पतसंस्थेत १८०० सभासद आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या ठरावात तातडीचे कर्ज म्हणून पाचऐवजी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. मोठे कर्ज म्हणून दीडऐवजी तीन लाख रुपये देण्याचेही निश्चित झाले. असे असतानाही सभासदांना कर्जासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. पतसंस्था बचाव कृती समितीने पाठपुरावा करूनही जिल्हा तालुका उपनिबंधकांनी दुर्लक्ष केले. पतसंस्थेच्या व्यवस्थापनाला तालुका उपनिबंधक पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. तातडीच्या कर्जासाठी पैसे शिल्लक नसल्याचे व्यवस्थापन सांगते. मनपा प्रशासन पैसे जमा करत नाही, असे उत्तर देण्यात येते.सभासदांच्या पगारातून दरमहा कर्जाचे हप्ते वसूल होतात. मागील सात-आठ वर्षांत पतसंस्थेत भ्रष्टाचार झाला असून तो उघड करण्यात येणार आहे. सभासदांवर होणाऱ्या अन्यायामुळे कोणतीही पूर्वसूचना देता पतसंस्थेच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा बोधे यांनी दिला.